शहरात पाणी कपातीचा शुक्रवारी होणार फैसला! आठवड्यात दोन दिवस पाणी पुरवठा बंदची शक्यता

 The decision to cut water in the city today nashik marathi news
The decision to cut water in the city today nashik marathi news

नाशिक : शहराला पाणी पुरवठा करणाया गंगापूर धरण परिसरात कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार असल्याने धरणात पुरेसा पाणी साठा होत आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता दिसतं तरी महासभा यासंदर्भात काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान शिवसेनेने जलसंपदा विभागासोबत आरक्षणाचा करार पुर्ण करावा एकदा आरक्षण निश्‍चित झाल्यानंतरचं पाणी कपातीचा निर्णय घ्यावा असे आवाहन केल्याने पाण्यावरून सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे

जुन महिन्यात एकुण पावसाच्या २५ टक्के पाऊस पडल्यानंतर जुलै महिना कोरडा गेल्याने २९ जुलैला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या बैठकीत पाण्याचे फेरनियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तीन ऑगष्टला जलसंपदा विभागाने महापालिकेला त्यावेळच्या उपलब्ध ५२ टक्के पाणी साठ्याचा विचार करून फेरनियोजन करण्याचे पत्र दिले होते. ऑगष्ट महिन्यातही पावसाचा अंदाज नसल्याने शहरात पाणी कपात करण्यासंदर्भात प्रशासनान पाणी कपातीचा प्रस्ताव महासभेवर ठेवला. शुक्रवारी (ता.१४) ऑनलाईन महासभा होणार असून यात पाणी कपातीचा निर्णय होईल. परंतू सध्या गंगापूर धरण व परिसरात पावसाचा जोर असून धरणाची पाणी पातळी देखील उंचावली आहे. त्यामुळे पाणी कपातीला सदस्यांचा विरोध राहील. शिवसेनेने सर्वप्रथम पाणी कपातीला विरोध केला आहे. 

सरासरी दहा टक्के कपातीचे नियोजन

धरण परिसरात पावसाला सुरुवात झाली असली तरी भविष्यात पाण्याने ओढ दिल्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पाणी कपातीला मान्यता दिल्यास सतरा ऑगष्ट पासून तातडीने कपातीची अंमलबजावणी करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दररोज साधारण पंधरा ते वीस मिनिटे पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात केली जाणार आहे. दररोज ५१० दशलक्ष लिटर्स पुरवठा होतो त्याएवजी ४६० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा केला जाईल. त्यानंतरही पावसाची ओढ कायम राहिल्यास आठवड्यातून एक किंवा दोन दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आरक्षणापेक्षा अतिरिक्त पाणी उपसा

गंगापुर धरण समुहात ३६०० दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित होते त्यापैकी १२ ऑगष्ट पर्यंत ३६४९ दशलक्ष घनफुट पाण्याचा  वापर झाला आहे. दारणा धरणात ४०० दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित करण्यात आले होते. त्यापैकी ३१९ पाणी वापरण्यात आले. मुकणे धरणातून एक हजार दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित करण्यात आले होते. त्यापैकी १२४५ दशलक्ष घनफुट पाणी उपसण्यात आले. शहरासाठी एकुण पाच हजार दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित करण्यात आले होते. त्यापैकी ५,२१४ दशलक्ष घनफुट पाण्याचा उपसा झाला असून अतिरिक्त २१४ दशलक्ष घनफुट पाण्याचा हिशोब महापालिकेला द्यावा लागणार आहे.

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com