''फडणवीस साहेब आता तुम्हीच तारणहार!'' कांदा निर्यातदारांचे माजी मुख्यमंत्र्यांना साकडे

महेंद्र महाजन
Monday, 21 September 2020

त्याचबरोबर बंदरात आणि सीमेवर अडवलेल्या कांद्याला पाणी सुटले आहे. त्यामुळे काही निर्यातदारांनी कंटेनर परत नेले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता, निर्यातबंदीच्या दिवशी अडवलेल्या कांद्याचा निर्यातीचा मार्ग मोकळा करावा, अशी माहिती श्री. फडणवीस यांच्यापुढे ठेवण्यात आल्याचे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतलेल्या दिवशी म्हणजेच, १४ सप्टेंबरला सकाळी सीमा शुल्क विभागाने कागदपत्रे केलेल्या बंदरातील आणि बांगलादेशच्या सीमेवरील कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळावी, अशी मागणी हॉर्टिकल्चर एक्सपोर्टर असोसिएशनतर्फे रविवारी (ता. २०) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. याबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोलण्याची तयारी श्री. फडणवीस यांनी दर्शवल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. 

अडवलेल्या कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा करावा...

संघटनेचे अध्यक्ष अजित सा, सुनील देवरे, अतीत कथ्थरानी, संदीप लुंकड, विकास सिंह यांनी हे निवेदन दिले. बंदर आणि बांगलादेशच्या सीमेवरील कांदा निर्यातीला परवानगी मिळाल्याचे श्रेय घेण्यास सुरवात झाली आहे. मात्र प्रत्यक्षात बंदरात अजूनही दीडशे कंटेनर, तर बांगलादेशच्या सीमेवर ६०० ट्रकभर कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेत आहेत. 'कस्टम'तर्फे १३ सप्टेंबरला केलेल्या कागदपत्रांच्या कांदा निर्यातीसाठी मान्यता मिळाली असून, या कांद्याचे प्रमाण ३० टक्के आहे. त्याचबरोबर बंदरात आणि सीमेवर अडवलेल्या कांद्याला पाणी सुटले आहे. त्यामुळे काही निर्यातदारांनी कंटेनर परत नेले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता, निर्यातबंदीच्या दिवशी अडवलेल्या कांद्याचा निर्यातीचा मार्ग मोकळा करावा, अशी माहिती श्री. फडणवीस यांच्यापुढे ठेवण्यात आल्याचे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

निर्यातीसाठी पाठवण्यात आलेल्या कांद्याच्या व्यवसायावर पंधरा लाख जणांचे कुटुंब अवलंबून आहे. हा कांदा रोखल्यास त्यांच्यावर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे 'कस्टम'ने अडवलेल्या सर्व कांद्याची निर्यात व्हायला हवी, अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे. - विकास सिंह (हॉर्टिकल्चर एक्स्पोर्टर असोसिएशन)

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand of onion exporters to former Chief Minister Devendra Fadnavis to solve the problem of onion export nashik marathi news