कांद्यावरील निर्यातबंदी हटवा! कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

onion market.jpg
onion market.jpg

लासलगाव (जि.नाशिक) : गेल्या दीड महिन्यात कांद्याच्या दरामध्ये पाच हजार तीनशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

कांदा निर्यातबंदी हटविण्याची मागणी 

नवीन कांद्याची आवक वाढल्याने कांद्याची घसरण थांबविण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार भारती पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याची मागणी केली आहे. गेल्या २० ऑक्टोबरला कांद्याला सरासरी सात हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता.

तोच कांदा आता एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. गेल्या ४५ दिवसांत कांदादरामध्ये २९५ टक्के घट झाल्याचे दिसून आले. या हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com