अजितदादांच्या मातोश्री म्हणतात.."त्रिमुर्तींचे सरकार टिकू दे..!" 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 22 January 2020

वणी येथील जगदंबामातेच्या दर्शनासाठी आशाताईचे भाचे व देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सुनील कदम, कुशल जगताप यांच्यासमवेत आल्या होत्या. येथील नातेवाईक असलेल्या बापूसाहेब जागीरदार यांच्या घरी त्यांनी प्रथम भेट देत कुटुंबीयांची विचारपूस केली. या वेळी जहागीरदार कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी जगदंबामातेच्या मंदिरात पूजा करीत देवीस शालू अर्पण केला व महाआरती केली.

नाशिक  : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकू दे, राज्याचे कल्याण होऊ दे आणि दादांच्या हातून राज्यातील जनतेची चांगली कामे होवोत, अशी प्रार्थना करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी मंगळवारी (ता. 21) वणी गावातील जगदंबामाता व गडावरील सप्तशृंगीचरणी नतमस्तक होत आदिमायेचे आशीर्वाद घेतले. 

आशाताई पवार यांचे सप्तशृंगीदेवीला साकडे..म्हणतात....

वणी येथील जगदंबामातेच्या दर्शनासाठी आशाताईचे भाचे व देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सुनील कदम, कुशल जगताप यांच्यासमवेत आल्या होत्या. येथील नातेवाईक असलेल्या बापूसाहेब जागीरदार यांच्या घरी त्यांनी प्रथम भेट देत कुटुंबीयांची विचारपूस केली. या वेळी जहागीरदार कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी जगदंबामातेच्या मंदिरात पूजा करीत देवीस शालू अर्पण केला व महाआरती केली. सप्तशृंगीदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, विश्‍वस्त रमेश देशमुख, अमोल देशमुख, राकेश थोरात, जनाबाई जागीरदार, लहानूबाई थोरात, पोपटराव थोरात, रवींद्र थोरात, गणेश देशमुख, सुरेश देशमुख आदींनी त्यांचे स्वागत केले. पुजारी सुधीर दवणे, ग्रामस्थ बबन जागीरदार, रोशन जागीरदार, सतीश जाधव, भरत शिरसाट, दिलीप जाधव, योगिता वर्मा आदींसह भाविक उपस्थित होते.

क्लिक करा > PHOTO : भीषण! क्षणात चक्काचूर..माय-लेकींचा करूण अंत

दर्शन घेऊन आनंद झाला..

दरम्यान, आशाताईंनी सप्तशृंगगडावरही आदिमायेची मध्यान्ह आरती करीत देवीस शालू अर्पण करून दर्शन घेतले. बऱ्याच दिवसांपासून देवीदर्शनाची इच्छा होती. त्यामुळे दर्शन घेऊन आनंद झाल्याचे आशाताईंनी "सकाळ'ला सांगितले. 

हेही वाचा > थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar,s Mother Aasha Pawar talking about state government Nashik Marathi News