esakal | दिवाळीपूर्वी महापालिका वेतन निश्‍चित करा; पालकमंत्र्यांच्या सूचनेने कर्मचारीवर्गात उत्साह 
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal.

महापालिका कर्मचार्यांना शासनाच्या समकक्ष वेतनश्रेणी लागू करण्याच्या सूचना शासनाने दिल्याने अधिकार्यांच्या वेतनात अपेक्षित वाढ होणार नाही. तर अनेकांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

दिवाळीपूर्वी महापालिका वेतन निश्‍चित करा; पालकमंत्र्यांच्या सूचनेने कर्मचारीवर्गात उत्साह 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : सातव्या वेतन आयोगानुसार महापालिकेच्या सर्व कर्मचार्यांचे दिवाळीपूर्वी वेतन निश्‍चिती करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ देणार नसल्याचा दिलासा त्यांनी शिष्टमंडळाला दिल्याने कर्मचारीवर्गात उत्साह संचारला आहे. 

महापालिका कर्मचार्यांना शासनाच्या समकक्ष वेतनश्रेणी लागू करण्याच्या सूचना शासनाने दिल्याने अधिकार्यांच्या वेतनात अपेक्षित वाढ होणार नाही. तर अनेकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणेच नाशिक महापालिकेच्या कर्मचार्यांचे वेतन आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दहा टक्के वाढीसह सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. परंतु नाशिक महापालिकेत अद्यापही लागू न झाल्याने त्याधर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी महापालिकेती कर्मचारी संघटनांनी केली. त्यापार्श्‍वभूमीवर मंत्रालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांची कर्मचार्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी कर्मचार्यांचे आर्थिक नुकसान होणार नसल्याचा दिलासा त्यांनी दिला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आदेशाचा अभ्यास करून १४ नोव्हेंबरपर्यंत वेतन निश्चिती करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. 

हेही वाचा >  ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

go to top