शहराला बदनाम करणाऱ्या समाजकंटकांची गय नाही : IGP दिघावकर

प्रमोद सावंत
Thursday, 12 November 2020

शहर आपले आहे, त्याची प्रगती व विकासाची दिशा निश्‍चित करा. पोलिस प्रशासन नेहमीच तुमच्यासोबत राहील. जनतेने सातत्याने ठेवलेल्या एकता व शांततेमुळे शहराची संवेदनशीलतेची ओळख दूर झाली. काही समाजकंटक शहराला बदनाम करतात. त्यांना वेळीच रोखण्याची गरज आहे.

मालेगाव (जि.नाशिक) : शहर आपले आहे, त्याची प्रगती व विकासाची दिशा निश्‍चित करा. पोलिस प्रशासन नेहमीच तुमच्यासोबत राहील. जनतेने सातत्याने ठेवलेल्या एकता व शांततेमुळे शहराची संवेदनशीलतेची ओळख दूर झाली. काही समाजकंटक शहराला बदनाम करतात. त्यांना वेळीच रोखण्याची गरज आहे. बदमाशांची गय होणार नाही, असे प्रतिपादन नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी येथे केले.

शहराला बदनाम करणाऱ्या समाजकंटकांची गय नाही

येथील नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद हॉलमध्ये मंगळवारी (ता. १०) त्यांनी शहरातील मुस्लिम धर्मगुरू व नागरिकांची बैठक घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व संवाद साधला. या वेळी मौलाना अब्दुल हमीद अझहरी, अतहर हुसैन अशरफी, हाजी युसूफ इलियास, मौलाना कय्यूम कासमी आदींनी मनोगत व्यक्त केले. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी स्वागत केले. उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी आभार मानले. या वेळी प्रमुख मौलाना व विविध पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले, रवींद्र देशमुख, खगेंद्र टेंभेकर आदींसह अधिकारी, नागरिक उपस्थित होते.  

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development of Malegaon Set the direction said by igp dighavkar nashik marathi news