PHOTOS : ऐतिहासिक लढाईचे साक्षीदार असलेले 'रनतळ' आजही विकासापासून दूर!

संदीप मोगल : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

सुरतेची लूट करून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राज्यात परतत होते तेव्हा दिंडोरी जवळील रनतळ येथे मुघल सरदार दाउदखान याने गाठत. दाउदखान याचा सरदार 
हखलासखान हरोली आणि मराठ्यांमध्ये जोरदार लढाई झाली. यात तीन हजार मुघल सैनिक मारले गेले.

नाशिक : (लखमापूर) सुरतेची लूट करून परतत असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांना मुगल सरदार दाउदखान याने दिंडोरीजवळील रनतळ येथे गाठल्यानंतर येथे झालेल्या लढाईचे साक्षीदार ठरलेले रनतळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही विकासा च्या प्रतीक्षेत आहे. आज हे ऐतिहासिक रनतळ केवळ पावसाचे पाणी साठविण्यापुरतेच उरले असल्याने या भागाचा विकास व्हावा, अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.

ऐतिहासिक लढाईचे साक्षीदार असलेले रनतळ आज विकासापासून दूर
 
सुरतेची लूट करून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राज्यात परतत होते तेव्हा दिंडोरी जवळील रनतळ येथे मुघल सरदार दाउदखान याने गाठत. दाउदखान याचा सरदार 
हखलासखान हरोली आणि मराठ्यांमध्ये जोरदार लढाई झाली. यात तीन हजार मुघल सैनिक मारले गेले. हखलासखान हरोली ठार झाला, तर दाउदखान पळून गेला. या लढाईमध्ये संताजी यांनी मोठे शोर्य दाखविले. मात्र, या ऐतिहासिक लढाईचे साक्षीदार असलेले रनतळ आज विकासापासून दूर आहे. आज हे रनतळ केवळ पावसाचे पाणी साठविण्याचे ठिकाण बनले आहे. 

Image may contain: sky, cloud, mountain, plant, outdoor, nature and water

हेही वाचा > सोशल मीडियाच्या युगात देखील 'बोहाडा'मुळे पारंपरिक लोककलेला नवीन उभारी!

Image may contain: sky, plant, mountain, cloud, outdoor, nature and water

संवर्धन करण्याची मागणी शिवप्रेमींकडून होतेय

मध्यंतरी तहसील कार्यालय आणि शेतकऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून माती काढून परिसर सकस करण्यात आला. मात्र, त्यानंतर पुन्हा या ठिकाणी कुठलीच मोठी मोहीम राबविण्यात आली नाही. त्यामुळे हा परिसर पुन्हा एकदा अस्वच्छ बनला आहे. शिवप्रेमी व दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी दिंडोरीच्या नागरिकांच्या मदतीने काही दिवसांपूर्वी या परिसरात श्रमदानातून स्वच्छता केली व गडकिल्ल्याच्या प्रतिकृती तयार करून मोठी स्पर्धा घेऊन नागरिकांना या वस्तूचे महत्त्व समजून देण्याच्या व या भागात नागरिकांची वर्दळ वाढविण्यासाठी चांगला प्रयत्न केला. मात्र, ऐतिहासिक वस्तूच्या संवर्धनासाठी पालिकेने सरकारच्या मदतीने पर्यटन विकास आराखडा तयार करून संवर्धन करण्याची मागणी शिवप्रेमीं कडून होत आहे. 

Image may contain: outdoor

हेही वाचा > ShivJayanti 2020 :  सातासमुद्रापार शिवजयंतीचा डंका...न्यूयॉर्कच्या भारतीय दूतावासात महाराजांना मानाचा मुजरा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dindori's historic runtal awaits development nashik marathi news