
आतापर्यंत १९ लाख ९७ हजार ४७४ क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले. स्थलांतरित झालेले; परंतु लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे तीन लाख ७१ हजार ४८२ शिधापत्रिकाधारकांमार्फत ते जेथे राहत आहेत, तेथे पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत अन्नधान्याची उचल केली आहे.
नाशिक : राज्यातील ५२ हजार ४३४ स्वस्त धान्य दुकानांतून ३१ जुलैपर्यंत सहा कोटी ५२ लाख ३२ हजार ४४८ लाभार्थ्यांना ५६ लाख ६६ हजार ३७६ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
१५ लाख ९६ हजार ७९८ क्विंटल तांदळाचे वाटप
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी लाभार्थी अशा रेशनकार्डवरील सात कोटी ४९ लाख नागरिकांपैकी सहा कोटी ५२ लाख ३२ हजार ४४८ लाभार्थ्यांना २० लाख ७२ हजार १०४ क्विंटल गहू, १५ लाख ९६ हजार ७९८ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना पाच किलो
अन्नधान्य (गहू व तांदूळ) मोफत देण्याच्या योजनेमधून जुलैसाठी आतापर्यंत १९ लाख ९७ हजार ४७४ क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले. स्थलांतरित झालेले; परंतु लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे तीन लाख ७१ हजार ४८२ शिधापत्रिकाधारकांमार्फत ते जेथे राहत आहेत, तेथे पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत अन्नधान्याची उचल केली आहे.
तूर, हरभराडाळ मोफत देण्याची तरतूद
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून प्रतिलाभार्थी प्रतिमहिना पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येतो. या योजनेमधून जूनसाठी आतापर्यंत ३२ लाख ४३५ क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे. कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी तीन कोटी आठ लाख ४४ हजार ७६ एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू आठ रुपये प्रतिकिलो व तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे आतापर्यंत १३ लाख चार हजार ४६ क्विंटल मे व जूनसाठी वाटप केले आहे.
हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रतिरेशनकार्ड एक किलो तूर किंवा हरभराडाळ मोफत देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे तीन लाख ८९ हजार ७९२ क्विंटल डाळीचे एप्रिल ते जूनसाठी वाटप केले आहे.
हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना
संपादन - किशोरी वाघ