photo : ...अन् निवारा केंद्राला जिल्हाधिकारींची "सरप्राइज'' भेट....सोयी-सुविधांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, परमेश्‍वर कासोळे आदींनी निवारा केंद्राला "सरप्राइज' भेट देत सोयी-सुविधांची पाहणी केली. निर्वासितांशी चर्चा करीत, त्यांच्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. दाउदी बोहरी समाजातर्फे बुधवारी "शब- ए- बारात'निमित्त भोजनाची सोय करण्यात आली होती. नाशिक रोडच्या मित्रांगण या बिटको महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपतर्फे गव्हाची मदत देण्यात आली. यावेळी निवारा केंद्रात मदतीचा मोठा ओघ असल्याचे सांगण्यात आले. 

नाशिक : मुंबईतून उत्तर प्रदेशाकडे पायी निघालेल्या परप्रांतीय मजूर-स्थलातंरित सध्या निवारा केंद्रात राहण्या- खाण्याची सोय तसेच दिवसातून दोनदा वैद्यकीय चाचणीसोबतच आदिवासी विकास विभागाच्या मुलांच्या वसतिगृहात प्रत्येक ठिकाणी मोबाईल चार्जरची सोय असल्याने घराकडच्या ख्याली- खुशालीत ते आपला दिवस खर्ची घालत आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, परमेश्‍वर कासोळे आदींनी निवारा केंद्राला बुधवारी (ता. 8) रोजी "सरप्राइज' भेट देत सोयी-सुविधांची पाहणी केली. निर्वासितांशी चर्चा करीत, त्यांच्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.

सामाजिक संस्थांकडून मदतीचा ओघ

मुंबईहून उत्तर प्रदेशात चालत निघालेल्या मुंबईतील स्थलांतरितांना इगतपुरीत जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेत त्यांना नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण विभागाच्या, तर काहींनी फेम चित्रपटगृहासमोरील शिवाजीनगर येथील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृह इमारतीत क्वारंटाइन केले आहे. सामाजिक संस्थांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. वसतिगृहात वीज, पाणी, स्वच्छतागृहाची सुविधा आहे. गावाकडे जाण्याच्या ओढीने एक हजार किलोमीटर चालण्याची तयारी करीत पायी निघालेले हे क्वारंटाइन कुटुंब सध्या बऱ्यापैकी स्थिरावले आहे. चहापान, जेवणानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी होते. त्यामुळे दिवस कसा घालवावा, ही त्यांची प्रमुख व्यथा आहे. त्याची व्यवस्था झाली आहे. प्रत्येक खोलीत मोबाईल चार्जिंगची सोय असल्याने मोबाईल चार्ज करायचा आणि गावाकडच्या कुटुंबीयांशी बोलायचे, असा त्यांचा दिनक्रम बनला आहे. 

Image may contain: 2 people, including Shailesh Malode, people standing and outdoor

निर्वासितांशी चर्चा करत त्यांच्या सोयी-सुविधांची माहिती घेतली

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, परमेश्‍वर कासोळे आदींनी निवारा केंद्राला "सरप्राइज' भेट देत सोयी-सुविधांची पाहणी केली. निर्वासितांशी चर्चा करीत, त्यांच्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. दाउदी बोहरी समाजातर्फे बुधवारी "शब- ए- बारात'निमित्त भोजनाची सोय करण्यात आली होती. नाशिक रोडच्या मित्रांगण या बिटको महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपतर्फे गव्हाची मदत देण्यात आली. या वेळी निवारा केंद्रात मदतीचा मोठा ओघ असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा > अहो काय सांगता, स्पर्श न होता उघडणार दार?...'या' विद्यार्थ्यांनी लढविली अनोखी शक्कल

शिवाजीनगरच्या निवारा केंद्रात परराज्यातील 253 मजूर आहेत. अनेक जण कुटुंबासोबत राहतात. त्यांच्याशी चर्चा केली. सगळे सोयी-सुविधांबाबत समाधानी आहेत. विशेष म्हणजे शहरातील सामाजिक संस्थांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. संकटात इतरांसाठी धावून जाण्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्साह कौतुकास्पद आहे. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी 

हेही वाचा > "कोरोना व्हायरस''चा ऑनलाइन जगतातही संसर्ग...सावध व्हा!...कारण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector Suraj Mandhare, Deputy Collector Nitin Mundavare, bhagwan Kasole etc. visited the shelter center and inspected the facilities nashik marathi news