PHOTO : अत्याचारानंतर लपलेला कुख्यात "भाई" अखेर जेरबंद

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 16 January 2020

शहरातील सिडको आणि पंचवटीत राहून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या संदेशविरोधात शहर पोलिसांच्या कारवाया कशा झाल्या नाहीत, असा प्रश्‍न काही दिवसांपासून उपस्थित झाला आहे. मात्र पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी हे आरोप फेटाळत तत्कालीन उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी 7 फेब्रुवारी 2017 ला त्याला शहरातून तडीपार करून धुळ्याला पाठविले होते.

नाशिक :  फार्महाउसवर वाढदिवशी डीजेवादकांवरील अनैसर्गिक अत्याचारानंतर नवापूर (जि. नंदुरबार) येथे लपून बसलेल्या कुख्यात संदेश काजळे यास नाशिक ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी (ता. 14) गजाआड केले. दरम्यान, कुख्यात काजळेविरुद्ध शहर पोलिसांनी दोन वर्षांत कारवाया कशा केल्या नाहीत, असा नवाच प्रश्‍न पुढे आला आहे.

धुळ्याच्या भूषण सुर्वेसह आणखी एकास अटक 

नाशिक तालुका पोलिस ठाणे हद्दीतील दरी-मातोरी शिवारातील शिवगंगा फार्महाउसवर कुख्यात गुन्हेगार संदेश सूर्यकांत काजळे याच्या वाढदिवसानिमित्त 10 जानेवारीला झालेल्या पार्टीत प्रथमेश खामकर व विनय पगारे (दोघे रा. कर्णनगर, नाशिक) या दोन डीजेवादकांवर अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांना कुख्यात संदेश काजळे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नवापूर येथे जात नवापूर-सुरत रस्त्यावर मंगळवारी संदेश काजळे (वय 29) त्याच्यासोबत असलेले भूषण राजेंद्र सुर्वे (30, रा. भाईजीनगर, धुळे) व रवींद्र दत्तात्रय सूर्यवंशी (30, रा. नाशिक) या तिघांना ताब्यात घेतले. 

Image may contain: one or more people, people standing and shoes
दोन वर्षांपूर्वी तडीपार : नांगरे-पाटील 
कुख्यात संदेश याच्याविरोधात खुनासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहरातील सिडको आणि पंचवटीत राहून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या संदेशविरोधात शहर पोलिसांच्या कारवाया कशा झाल्या नाहीत, असा प्रश्‍न काही दिवसांपासून उपस्थित झाला आहे. मात्र पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी हे आरोप फेटाळत तत्कालीन उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी 7 फेब्रुवारी 2017 ला संदेशला शहरातून तडीपार करून धुळ्याला पाठविले होते. त्यानंतर त्याला 24 एप्रिल 2019 ला त्याच्यावर कलम 110 ई-ग अंर्तगत कारवाई करून एक वर्षाचा चांगल्या वर्तणुकीचा बॉंड घेतला होता. नाशिक शहर-ग्रामीण पोलिसांत पुरेसा समन्वय असून, विसंवाद नसल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा > "चादर गॅंग'चा प्रताप..चादरीचा आसरा घेऊन करायचे 'असा' गुन्हा की...!

हिस्ट्रीसीटर संदेशवरील गुन्हे 
पोलिस ठाणे गुन्हा रजि.नं. कलम 
अंबड पोलिस ठाणे 482 (2009) 394 
अंबड पोलिस ठाणे 615 (2009) 324 गंभीर मारहाण 
अंबड पोलिस ठाणे 367 (2015) 324 गंभीर मारहाण 
अंबड पोलिस ठाणे 226 (2016) 365,326 
अंबड पोलिस ठाणे एनसी-299 (2015) 504, 506 
पंचवटी पोलिस ठाणे 217 (2008) 379 
पंचवटी पोलिस ठाणे 556 (2008) 307, 34 
पंचवटी पोलिस ठाणे 89 (2009) 379 
पंचवटी पोलिस ठाणे 170 (2010) 307 
सरकारवाडा पोलिस 585 (2011) खुनाचा गुन्हा 

 VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DJ operator torture case suspect arrested Nashik Crime Marathi News