गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या 'गुगल'चा वाढदिवस; कामगिरीचे सर्वत्र कौतुक

सोपान मते
Tuesday, 29 September 2020

गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा हा गुगल नेहमीच सर्वांचाच चर्चेचा विषय राहिला आहे, मग ती चोरी असो अथवा घर फोडी असो प्रत्येक घटनेतील गुन्हेगारीच्या शोध मोहिमेमध्ये गुगलचा सिंहाचा वाटा असतो.

नाशिक : हॅप्पी बर्थडे गुगल! अहो पण हा गुगल म्‍हणजे इंटरनेटवरील लोकप्रिय सर्च इंजन नव्‍हे, तर पोलिसांच्‍या पथकातील एक श्‍वान आहे. आधुनिक युगामध्ये नेहमीच काहीही माहिती हवी असल्यास आपण लगेच इंटरनेटवर गुगल सर्च करतो परंतु हा श्वान असून कमीत कमी वेळेत गुन्हेगारा विषयी माहिती पोलीस पथकाला देत असल्यामुळे याचे नाव गुगल असावे. त्याने अनेक गुन्‍हे उघडकीस आणण्यात मदत केली आहे. जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत.

गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा हा गुगल नेहमीच सर्वांचाच चर्चेचा विषय राहिला आहे, मग ती चोरी असो अथवा घर फोडी असो प्रत्येक घटनेतील गुन्हेगारीच्या शोध मोहिमेमध्ये गुगलचा सिंहाचा वाटा असतो. पोलिसांसोबत काम करत असताना कोणतीही कामगिरी गुगलने अतिशय प्रामाणिक पणे पार पडल्या असल्याचे सांगितले गेले.

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

विविध क्षेत्रातून नेहमीच कौतुक 

नाशिक पोलिसांना नेहमीच विविध पदके मिळवून देणाऱ्या गुगलचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आतापर्यंत विविध पदकं मिळवून देण्याची कामगिरीही गुगलने केली आहे तसेच विविध शोध मोहिमांमध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे या लाडक्या श्वानाचा म्हणजेच गुगलचा वाढदिवस श्वान हस्तकाकांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुगल सध्या तीन वर्षाचा असून त्यांच्या कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातून नेहमीच कौतुक होत असते. यावेळी उपस्थित एस आय मोरे, पोलीस नाईक, नाना बागुल, निलेश बाविस्कर, अरुण चव्हाण, विलास पवार, गणेश कोंडे, राजू जाधव, वामन पगारे, सुधिर देसाई इत्यादी उपस्थित होते. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dog googles birthday celebrated by police force nashik marathi news