खबरदार.. स्वातंत्र्यदिनी तिरंगी मास्क वापरताय तर सावधान! पडेल महागात..

विनोद बेदरकर
Friday, 14 August 2020

कोरोनापासून संरक्षणासाठी प्रत्येक जण मास्क वापरतोय. मास्क वापरणे अनिवार्य झाल्याने त्यात आकाराचे, रंगांचे, डिझाइन्सचे, मॅचिंग मास्क वापरण्याचा ट्रेंड सुरू आला आहे. शनिवारच्या १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात आपला राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याचे हे मास्क विक्रीला आले असून, धक्कादायक बाब म्हणजे या मास्कवर तिरंगा ध्वज आणि अशोक चक्राचाही समावेश आहे.

नाशिक : उत्साहात तिरंगा मास्क वापरणे तुम्हाला महागात पडू शकते. राष्ट्रध्वजाच्या प्रतिमेशी साधर्म्य असलेल्या तिरंगा मास्कची विक्री व वापरल्यास थेट अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तसा इशारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा मान राखणे आपले प्रत्येकाचेच कर्तव्य असल्याने शनिवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिनी तिरंगा मास्क खरेदी करू नका आणि वापर करणेही टाळा. 

खबरदार.. तिरंगी मास्क वापरताय तर सावधान!
कोरोनापासून संरक्षणासाठी प्रत्येक जण मास्क वापरतोय. मास्क वापरणे अनिवार्य झाल्याने त्यात आकाराचे, रंगांचे, डिझाइन्सचे, मॅचिंग मास्क वापरण्याचा ट्रेंड सुरू आला आहे. शनिवारच्या १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात आपला राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याचे हे मास्क विक्रीला आले असून, धक्कादायक बाब म्हणजे या मास्कवर तिरंगा ध्वज आणि अशोक चक्राचाही समावेश आहे. स्वातंत्र्यदिनी बक्कळ कमाई होईल, या उद्देशाने साक्री (जि. धुळे) येथील एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात हे मास्क विक्रीला आणण्यात आले असावेत. मात्र तिरंगा मास्क वापरणे फारच महागात पडू शकते. कारण देशाचा अभिमान असलेल्या राष्ट्रध्वजाप्रमाणेच असलेले हे तिरंगा मास्क वापरणे म्हणजे तिरंग्याचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे तिरंगा मास्कची विक्री करणाऱ्या आणि ते वापरणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. 

 यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान
राष्ट्रध्वज हे काही सजावटीचे माध्यम नाही. अशा प्रकारचे मास्क वापरल्यास शिंकणे, त्याला थुंकी लागणे, तो अस्वच्छ होणे, वापरानंतर कचऱ्यात टाकणे यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होणार आहे. हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०’, कलम २ व ५ नुसार; तसेच ‘राष्ट्रप्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१’चे कलम २ नुसार व ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय गुन्हा आहे  

भारतीय राष्ट्रध्वज हा कोट्यवधी भारतीयांसाठी अस्मितेचा विषय आहे. अपवाद वगळता अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. -संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dont wear a tricolor mask on Independence Day nashik marathi news