मनमाड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारींची तडकाफडकी बदली...शहरात नाराजीचा सूर

dilip menkar.jpg
dilip menkar.jpg

नाशिक / मनमाड : मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर यांची आज  तडकाफडकी बदली करण्यात आली. सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी आज सकाळी सिन्नर येथे सूत्रे स्वीकारली आहे 

डॉ मेनकरांची बदली केल्याने शहरात नाराजीचा सूर
मनमाड नगर परिषदेचा दीर्घकाळ अनुभव असलेले मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर हे अनुभवी मुख्याधिकारी होते विशेषतः त्यांच्या कार्यकाळात करंजवन जलवाहिनी योजना शासन दरबारी सादर करण्यात आली. योजनेचे बारकावे माहीत असलेल्या डॉ मेनकर यांची योजना होईपर्यंत येथे नेमणूक होईल अशी नागरिकांना अटकळ असतांनाच आज त्यांची बदली झाल्याचे पत्र त्यांच्या हाती पडले. लॉकडाऊन झाल्यापासून त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले मात्र शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना त्यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र त्यांच्या पदावर दुसऱ्या मुख्याधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली नाही. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मनमाड शहरात अनुभवी आणि विकासाला चालना देणाऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक होणे गरजेचे आहे दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक न करताच डॉ मेनकरांची बदली केल्याने शहरात नाराजीचा सूर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com