PHOTOS : धक्कादायक..संचारबंदीत एकीकडे पोलीसांकडून 'जीवाचे रान'... दुसरीकडे मद्यधुंदीत पोलीसाकडून घडतो "हा" प्रकार

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 6 May 2020

कोरोना संचार बंदीच्या काळात एकीकडे पोलीस आपल्या "जीवाचे रान करत"  नागरिकांच्या जीवाचे रक्षण करत असताना, दुसरीकडे याच पोलीस खात्यातील दोन बेजबाबदार पोलीस कर्मचारी मद्यधुंदीत "हम करे सो कायदा" अशा पद्धतीने वागत आहेत.

नाशिक : नाशिकमध्ये एकीकडे कोरोनाचे थैमान वाढत असताना सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीकोनातून अन् वाढत्या रुग्णसंख्येवर रोक लावण्यासाठी दुसरीकडे मात्र दारु विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारींनी दिले आहेत. अशातच रात्रीच्या सुमारास मद्यधुंद पोलिसांचा कारनामा समोर आला आहे.कोरोना संचार बंदीच्या काळात एकीकडे पोलीस आपल्या "जीवाचे रान करत"  नागरिकांच्या जीवाचे रक्षण करत असताना, दुसरीकडे याच पोलीस खात्यातील दोन बेजबाबदार पोलीस कर्मचारी मद्यधुंदीत "हम करे सो कायदा" अशा पद्धतीने वागत आहेत.

असा घडला प्रकार

मंगळवारी रात्री सागर हजारे या पोलिस कर्मचाऱ्यांने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत लेखा नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्या घरासमोरील उभ्या असलेल्या सागर जाधव यांच्या वाहनास जोरदार धडक दिली. याबाबत त्यांना जाब विचारण्यास गेलेल्या गौळाण्याचे सरपंच अजिंक्य चुंबळे यांना दोन पोलीस कर्मचारी यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी हे करीत आहे. यातील संशयित आरोपी  हा स्वतः सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी असून त्याची पत्नी, सासरे व भाऊ हे देखील पोलीस कर्मचारी असल्याचे समजते.

Image may contain: one or more people, people standing and car

मद्य कुठून विकत घेतले?
कोरोनामुळे सध्या मद्यविक्रीस बंदी असताना पोलीस कर्मचाऱ्याने मद्य कुठून विकत घेतले याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. रात्री (ता.५) मद्यधुंद पोलिसांनी मध्यरात्री राडा केला. दारुच्या नशेत असलेल्या या पोलिसांनी लेखानगर भागात वाहनांना धडक दिली. भररस्त्यात ज्यांची वाहने ठोकली, त्याच नागरिकांना या पोलिसांनी मारहाण केली. याप्रकरणी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हे दोन्ही पोलीस कर्मचारी शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत.

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

No photo description available.

संचारबंदीत पोलीस "जीवाचे रान करत" करत असतानाच ही घटना...

कोरोना संचार बंदीच्या काळात एकीकडे पोलीस आपल्या "जीवाचे रान करत"  नागरिकांच्या जीवाचे रक्षण करत असताना, दुसरीकडे याच पोलीस खात्यातील दोन बेजबाबदार पोलीस कर्मचारी "हम करे सो कायदा" अशा पद्धतीने वागत मद्यप्राशन करून बेदरकारपणे गाडी चालून रस्त्यात उभे असलेले वाहन उडवून त्यांना जाब विचारणार्याना शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी कायद्याच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेत कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे असे दाखवून दिले आहे.

हेही वाचा > "चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा

Image may contain: one or more people and people standing

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drunken police hitting driver in Nashik crime marathi news