SakalEffect : मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणारे दोन पोलीस अखेर निलंबित..सकाळच्या बातमीची दखल!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

कोरोना संचार बंदीच्या काळात एकीकडे पोलीस आपल्या "जीवाचे रान करत"  नागरिकांच्या जीवाचे रक्षण करत असताना, दुसरीकडे याच पोलीस खात्यातील दोन बेजबाबदार पोलीस कर्मचारी मद्यधुंदीत "हम करे सो कायदा" अशा पद्धतीने वागत आहेत.

नाशिक : कोरोना संचार बंदीच्या काळात एकीकडे पोलीस आपल्या "जीवाचे रान करत"  नागरिकांच्या जीवाचे रक्षण करत असताना, दुसरीकडे याच पोलीस खात्यातील दोन बेजबाबदार पोलीस कर्मचारी मद्यधुंदीत "हम करे सो कायदा" अशा पद्धतीने वागत आहेत. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या व नागरिकांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

सकाळने फोडली वाचा.. कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्वागत

दैनिक सकाळ'ने प्रथम ऑनलाईन  व नंतर बातमी स्वरूपात वाचा फोडली होती. त्याची पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. लेखानगर येथे रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या व आपल्या पोलीस भावास बोलावून उपस्थित वाहन मालकास व भांडण सोडविण्यात जाणाऱ्या एका युवकास जबर मारहाण करून अजिंक्य चुंबळे यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरकार वाडा व पंचवटी पोलीस ठाण्यातील सागर हजारे व मयुर हजारे या दोन पोलीस कर्मचारी असलेल्या भावंडास निलंबित करण्यात आल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या कडक कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्वागत होत आहे. 

असा घडला होता प्रकार

सागर हजारे या पोलिस कर्मचाऱ्याने मंगळवारी (ता.5) रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत लेखानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या सागर जाधव यांच्या वाहनास जोरदार धडक दिली. जाधव यांनी घराबाहेर आल्यानंतर गाडीला एका चारचाकी गाडीने धडक दिल्याचे बघितले. या चारचाकीत असलेल्या हजारे यांना बाहेर काढण्यात आले. हजारे यांनी त्यांच्या भावाला फोन लावून बोलविले. त्यांचा भाऊ मयूर याने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी जाधव आणि अजिंक्‍य चुंभळे यांनी गाडीला धडक दिल्याबद्दल विचारणा केली असता हजारे बंधूंनी जाधव यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच अजिंक्‍य चुंभळे यांना ठार करण्याची धमकी दिली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या इरफान शेख यालाही मारहाण केली होती . याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी सागर हजारे सरकारवाडा पोलिस ठाण्यात कर्मचारी असून, त्याची पत्नी, सासरे व भाऊदेखील पोलिस कर्मचारी असल्याचे समजते. यावर कारवाई करीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Image may contain: one or more people, people standing and car

मद्य कुठून विकत घेतले?
कोरोनामुळे सध्या मद्यविक्रीस बंदी असताना पोलीस कर्मचाऱ्याने मद्य कुठून विकत घेतले याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. रात्री (ता.५) मद्यधुंद पोलिसांनी मध्यरात्री राडा केला. दारुच्या नशेत असलेल्या या पोलिसांनी लेखानगर भागात वाहनांना धडक दिली. भररस्त्यात ज्यांची वाहने ठोकली, त्याच नागरिकांना या पोलिसांनी मारहाण केली. याप्रकरणी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हे दोन्ही पोलीस कर्मचारी शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

No photo description available.

हेही वाचा > "चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा

Image may contain: one or more people and people standing


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drunken police hitting driver in Nashik crime marathi news