"उत्पन्न तर काहीच नाही..पण खर्च म्हणाल तर अरे बापरे.!" "या' बस आगारावर का आली ही वेळ? 

bus stand.jpg
bus stand.jpg

नाशिक / लासलगाव : गेल्या काही दिवसांपासून लासलगाव आगाराकडून प्रवाशांना जास्तीत जास्त बससेवेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, कोठे ये-जा करण्यासाठीही स्वतःच्याच वाहनांना पसंती देत आहेत.त्यामुळे काही बसआगारांवर आमदनी चवन्नी भी नहीं और खर्चा नहीं पूछों तो अच्छा ! अशी वेळ आली आहे.

स्वतःच्याच वाहनांना पसंती 
गेल्या काही दिवसांपासून लासलगाव आगाराकडून प्रवाशांना जास्तीत जास्त बससेवेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, कोठे ये-जा करण्यासाठीही स्वतःच्याच वाहनांना पसंती देत आहेत. त्यामुळे लासलगाव एसटी आगाराकडून लासलगाव - चांदवड, लासलगाव - मनमाड आणि लासलगाव - निफाड या मार्गावर एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या असल्या तरी प्रवाशांची संख्या खूपच कमी आहे. या मार्गांवर दोन दिवसांत केवळ 40 प्रवाशांनी प्रवास केला. यातून लासलगाव आगारला 819 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. लासलगाव प्रमाणेच जिल्ह्यातील सर्वच आगरांमध्ये अशीच स्थिती असून आधीच तोट्यात असलेल्या एसटीला कोरोनाचा खूपच मोठा फटका बसत आहे.

चक्क 14 हजार रुपयांचा खर्च अन् भत्ते तर हिशेबातच नाहीत. 

नाशिक जिल्हात आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व सार्वजनिक वाहतूकसेवाही बंद आहेत. मात्र जिल्हाअंतर्गत एसटी सेवेला परवानगी मिळाली असली तरी एसटीकडे अजूनही प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कारण, मंगळवार (ता.7) आणि बुधवार (ता.8) असे दोन दिवस मिळून सुमारे 800 किलोमीटर अंतर कापूनही लासलगाव आगाराच्या एसटी बसने केवळ 819 रुपये मिळवले आहेत. तर, यासाठी दोन दिवसांत डिझेलवर चक्क 14 हजार रुपयांचा खर्च झाला असून बसचालक आणि वाहक यांचे भत्ते तर हिशेबातच नाहीत. 

शेतमाल वाहतूकसेवाही देण्यास सज्ज 
परिणामी प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न थांबल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) शेतमाल वाहतूकसेवाही देण्यास सज्ज आहे. जून महिन्यात लासलगाव आगाराच्या माध्यमातून दहा टन कांदा मालाड, मुंबई येथे रवाना झाला होता. यातून काहिसा दिलासादायक उत्पन्न आगाराला मिळू शकले. मात्र आता प्रवासी वाहतूकीतून उत्पन्नाची हजारीही गाठत नसल्याने उत्पन्नवाढीसाठी मालवाहतुकीसारखे पर्याय वापरले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी निफाड, सिन्नर, चांदवड, मनमाड या ठिकाणी फेऱ्या सुरू असून, प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक समर्थ शेळके यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com