रमजान ईदनिमित्त 'या' मैदानावरील नमाज पठनात यंदा खंड...मुस्लिम बांधवांत नाराजीचा सूर  

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 मे 2020

रमजान पर्वाची सांगता रमजान ईदने होत असते. ईदगाह (गोल्फ क्‍लब) मैदान येथे शहर-ए-खतीब यांच्या नेतृत्वात ईदची सामुदायिक नमाज संपन्न होत असते. कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात देशात लॉकडाऊन सुरु आहे. सर्व प्रकारे धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आले आहे. धार्मिक सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानिमित्ताने यंदा रमजान ईदची नमाज देखील ईदगाह मैदानावर होवू शकणार नाही.

नाशिक : कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज होणार नाही. मुस्लिम बांधव तसेच धर्मगुरु मौलवींकडून घरीच नमाज पठन करण्यात येणार आहे. शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांनीही मशीद किंवा ईदगाह मैदानावर नमाजसाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. 

यंदा रमजान ईदची नमाज देखील ईदगाह मैदानावर नाही

रमजान पर्वाची सांगता रमजान ईदने होत असते. ईदगाह (गोल्फ क्‍लब) मैदान येथे शहर-ए-खतीब यांच्या नेतृत्वात ईदची सामुदायिक नमाज संपन्न होत असते. कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात देशात लॉकडाऊन सुरु आहे. सर्व प्रकारे धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आले आहे. धार्मिक सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानिमित्ताने यंदा रमजान ईदची नमाज देखील ईदगाह मैदानावर होवू शकणार नाही. खतीब यांनीही सरकारच्या सुचनांचे पालन करत ईद साजरी केली जाणार असल्याचे सांगत. ईदगाह मैदानावर ईदची नमाज होणार नसल्याची स्पष्ट केले आहे. गेल्या पाच वर्षातील दुसरी वेळ आहे. की ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज होवू शकली नाही. विशेष म्हणजे मशीदमध्ये नमाज होणार नसल्याने मुस्लिम बांधवाना घरी नमाज पठन करावे लागणार आहे. ईदगाहवर नमाज पठन करण्यास मोठी पुण्याची बाब असते. शिवाय वर्षातून बकरी ईद आणि रमजान ईद अशा दोनच नमाज ईदगाह मैदानावर होत असतात. त्यानिमित्ताने शहराच्या विविध भागातील हजारोंच्या संख्येने भाविक याठिकाणी नमाजसाठी येत असतात. नमाज पठन करुन एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा देत असतात.

पोलीसांसह पदाधिकारी येतात शुभेच्छा देण्यासाठी

पोलिस आयुक्तासह महापौर, खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यानिमित्ताने मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर येत असतात. मैदानावर मोठे उत्साहाचे वातावरण असते. यावर्षी मात्र ईदची नमाज ईदगाह मैदानावर होणार नसल्याने त्याठिकाणी उत्साह नव्हे तर शुकशुकाट बघावयास मिळणार आहे. 

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

रमजान ईदच्या सामुदायिक नमाजला खंड 
दरवर्षी रमजान ईदची सामुदायिक नमाज ईदगाह मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न होते. यंदा मात्र कोरोनामुळे नमाज होणार नाही. ईदगाहच्या इतिहासातील अर्थात सुमारे 100 वर्षात दुसऱ्यांचा अशा प्रकारचा खंड पडला आहे. गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी शहरावर नैसर्गिक आपत्ती ओढावली होती. ईदगाहवर नमाज न होता. शहरातील प्रत्येक मशीदमध्ये दोन जमातमध्ये नमाज संपन्न झाली होती. त्यानंतर यावर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी गर्दी टाळण्याच्या हेतून धार्मिक सामाजिक कार्यक्रमाना बंदी घालत गर्दी टाळली जात आहे. त्यामुळे यंदाही ईदची नमाज होवू शकणार नाही. विशेष म्हणजे त्यावेळेस मशीदमध्ये परवानगी होती. मात्र यावेळेस मशीदही बंद ठेवण्यात आल्याने मुस्लिम बांधवाना जमात ने नमाज पठनास मुकावे लागणार असल्याने त्यांच्यात नाराजीचे सुर आहे.  

हेही वाचा > शहर हादरून सोडल्यानंतर चोरपावलांनी 'त्याचा' गावात प्रवेश...अन् बघता बघता घातला घट्ट विळखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to corona This year Ramadan Eid prayers will not be held at Eidgah Maidan nashik marathi news