esakal | पिंपळगांव बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले; शेतकऱ्यांकडून लिलाव बंद
sakal

बोलून बातमी शोधा

pimplegaon onion.jpg

केंद्र शासनाने दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याला निर्यात बंदीच्या जोखंडात बांधल्या बरोबर आयाती रेड कार्पेट टाकल्याने कांद्याच्या दरावर आज(ता.२४) दबाव आला. शुक्रवारच्या तुलनेत बाजार भावात प्रतिक्विंंटल दोन हजार रुपयांची घसरण झाली. यावरून संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले.

पिंपळगांव बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले; शेतकऱ्यांकडून लिलाव बंद

sakal_logo
By
दीपक आहिरे

पिंपळगांव बसवंत (जि.नाशिक) : केंद्र शासनाने दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याला निर्यात बंदीच्या जोखंडात बांधल्या बरोबर आयाती रेड कार्पेट टाकल्याने कांद्याच्या दरावर आज(ता.२४) दबाव आला. शुक्रवारच्या तुलनेत बाजार भावात प्रतिक्विंंटल दोन हजार रुपयांची घसरण झाली. यावरून संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले.

केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी
पिंपळगांव बाजार समितीत शुक्रवारी कांद्याचे दर सरासरी ७ हजार रुपये प्रतिक्विंंटलवर स्थिरावले होते. आज लिलाव सुरु होताच दर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल कमी पुकारले. पाच हजार रुपये भाव पुकारताच शेतकरी संतप्त झाले. केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करत शेतकऱ्यांनी बाजार समिती आवार दणाणून सोडले.

हेही वाचा > धक्कादायक! उपजिल्हाधिकारी दालनात युवकाने अंगावर पेट्रोल ओतले; जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ

बाजार समिती कार्यालयावर शेतकर्यांनी मोर्चा काढला.यावेळी दिपक वाघ.(रानवड), गणेश शार्दूल(दिंडोरी), प्रभाकर शिंदे (नांदुर्डी), विठ्ठल गायकवाड(नांदुरा), शशिकांत फुकट.(चिंचखेड), शांताराम सोनवणे(दशवेल),सुनिल सोनवणे, विनोद मोरे(.सटाणा) आदी शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा > क्षणार्धात संसाराची राखरांगोळी! चव्हाण कुटुंबियांचे ५० हजारांचे नुकसान 

त्यामुळे आम्ही लिलाव बंद पाडले 

एका रात्री असे काय घडले की कांद्याचे दर दोन हजार रुपयांनी कोसळले. अतिवृष्टीने शेतातील कांद्याच्या उभ्या पिकांची नासाडी झाली, हे शेतकऱ्यांचे दुख शासनाला दिसत नाही. त्यामुळे आम्ही लिलाव बंद पाडले. - शेतकरी

संपादन - ज्योती देवरे