अतिवृष्टीने फुटला कालवा! पाणी थेट शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

या ठिकाणी कालवा फुटल्याच्या अनेक वेळा नोंदी आहे. सध्या पुणेगाव कालव्याचे पाणी 1 सप्टेंबर पासून सुरू होते. परंतु पाण्याचा फ्लो कमी झाल्याने पाणी 16 तारखेला बंद करण्यात आले होते. तरीही भाडगाव जवळ तो फुटला दरसवाडी धरण पूर्ण भरले यांनी मागील आठ दहा दिवसांपासून या धरणातून पाणी येवल्याकडे जात होते.

नाशिक : (रेडगांव खुर्द) चांदवड तालुक्यात शनिवारी (ता. 20) रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव कालवा तीन ठिकाणी फुटल्याने आजूबाजूच्या शेतांमध्ये दूरवर पाणी घुसून शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कालवा फुटल्याने येवल्याकडे पाणी जाणे बंद झाले असून येवलेकरांचे यावर्षी स्वप्न अधुरेच राहते की काय असे चित्र आहे.

सोयाबीन, कांदा पिकांचे प्रचंड नुकसान

हा कालवा भाडगाव येथे रामदास शेजवळ यांचे शेताजवळ फुटला. तर दुसऱ्या ठिकाणी दिघवद येथे पाटे हिवरखेडे राजरस्ता याठिकाणी आत्माराम काळे यांचे शेताजवळ दोन्हीही बाजूने फुटला. त्यामुळे सर्वत्र शेतांमध्ये पाणीच पाणी घुसून याठिकाणी मोरीचे काम कालवा निर्मितीपासून प्रलंबित आहे. तसेच याठिकाणी कालवा दरवर्षी फुटतो. त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान होते. काजी सांगवी येथेही बंटी ठाकरे यांचे शेताजवळ कालवा फुटल्याने मका सोयाबीन कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या ठिकाणी कालवा फुटल्याच्या अनेक वेळा नोंदी आहे. सध्या पुणेगाव कालव्याचे पाणी 1 सप्टेंबर पासून सुरू होते. परंतु पाण्याचा फ्लो कमी झाल्याने पाणी 16 तारखेला बंद करण्यात आले होते. तरीही भाडगाव जवळ तो फुटला दरसवाडी धरण पूर्ण भरले यांनी मागील आठ दहा दिवसांपासून या धरणातून पाणी येवल्याकडे जात होते. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

या कालव्यात दरसवाडी कोलटेक तसेच चांदवड लासलगाव रस्ता क्रासिंग या दोन ठिकाणी शेत शिवारातील पाणी कालव्यात सोडले असल्याने या कालव्याने मर्यादा ओलांडली असावी असा अंदाज आहे. तसेच या संपूर्ण कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने प्रत्येक वेळी पाणी चाचणीसाठी सोडल्यावर हा कालवा कुठे ना कुठे फुटत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rains Punegaon Daraswadi canal burst nashik marathi news