'इथल्या' शेतकऱ्यांसाठी "इकडे आड, तिकडे विहीर''...रब्बी पिकांसह द्राक्ष ही कवडीमोल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 एप्रिल 2020

(दिंडोरी) तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कोरोनामुळे रब्बी पिकांसह आर्थिक गणित बिघडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या माल काढण्यापासून ते बाजारात नेईपर्यंत मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. द्राक्ष काढणीसाठी मजूरवर्ग उपलब्ध नसल्यामुळे घरातील व्यक्तींना कामाला लावून ती तोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला व्यापारी घेत नाहीत. घेतला तर अतिशय अल्प दर मिळत आहे. 

नाशिक : (दिंडोरी) तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कोरोनामुळे रब्बी पिकांसह आर्थिक गणित बिघडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या माल काढण्यापासून ते बाजारात नेईपर्यंत मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. द्राक्ष काढणीसाठी मजूरवर्ग उपलब्ध नसल्यामुळे घरातील व्यक्तींना कामाला लावून ती तोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला व्यापारी घेत नाहीत. घेतला तर अतिशय अल्प दर मिळत आहे. 

उत्पादनखर्चसुद्धा निघणार नसल्याने शेतकरी अडचणीत

सध्या द्राक्ष पिकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करूनही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. इतर रब्बी पिकांची अवस्था तशाच स्वरूपाची असून, स्थानिक पातळीवरही तो विकण्यासाठी लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. सध्या व्यापारी द्राक्षबागांमध्ये येण्यास तयार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत जानोरी येथील शेतकरी सचिन घुमरे यांनी "सकाळ'ला सांगितले, की द्राक्ष स्वतःच्या जबाबदारीवर बुधवारी (ता. 8) पाठविले, तर सहा रुपये प्रतिकिलोने पैसे आले. आज सीमा बंद असल्याने माल पाठवू नका, असे सांगितल्यामुळे द्राक्ष पाठविणे बंद केले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! रागाच्या भरात 'त्याचे' हात देखील थरथरले नाही...बायकोला तर पेटवलंच अन् स्वत:देखील...

द्राक्षांचे बेदाणे बनवतोय...

मोहाडी येथील रमेश जाधव यांनी सांगितले, की व्यापारी द्राक्षबागेत नसल्याने, तसेच शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याने बेदाने घरीच बनविण्यासाठी सुरवात केली आहे. पालखेड बंधारा येथील सदाशिव जाधव यांनी शेतीमाल विक्री करून उत्पादनखर्चसुद्धा निघणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे सांगितले.  

हेही वाचा > मुलाला उच्चशिक्षित करण्याची 'त्यांची' इच्छा अपूर्णच...काळ असा आला की...मुलगाच
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the lockdown, grape products including Rabbi crops have been sold at low prices nashik marathi news