VIDEO : "पंधरा दिन से खाने के लिए मोहताज हो गए"...स्थलांतरितांचे अश्रू अनावर 

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 31 मार्च 2020

शरीराने नाशिकला असलेल्या परंतु मनाला घरची ओढ लागलेले हे स्थलांतरित घरी जाण्यासाठी प्रचंड व्याकूळ झाले होते. काही मजूर भिवंडी ते नाशिक, असा सुमारे 130 किलोमीटरचा प्रवास करून नाशिकमध्ये दाखल झाले होते. 
संबंधितांना नाशिक-पुणे महामार्गावरील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात, तर काहींना पाथर्डी भाग परिसरात थांबविण्यात आले आहे.

नाशिक : "खाने-पिनेका इन्तजाम नही हैं। पंधरा दिन से खाने के लिए मोहताज हो गये थे। दुखमें और दुख डाल दिया। हम इधर रो रहे हैं और हमारे बालबच्चे उधर गॉंव में इमारे इन्तजार मै हैं।', असे म्हणत उत्तर प्रदेश येथील स्थलांतरितांना अश्रू अनावर झाले. सोमवारी (ता. 30) या स्थलांतरितांना नाशिकमध्ये विविध ठिकाणी थांबविण्यात आले. शरीराने नाशिकला असलेल्या परंतु मनाला घरची ओढ लागलेले हे स्थलांतरित घरी जाण्यासाठी प्रचंड व्याकूळ झाले होते. काही मजूर भिवंडी ते नाशिक, असा सुमारे 130 किलोमीटरचा प्रवास करून नाशिकमध्ये दाखल झाले होते. 
संबंधितांना नाशिक-पुणे महामार्गावरील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात, तर काहींना पाथर्डी भाग परिसरात थांबविण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशला निघालेल्या स्थलांतरितांना अश्रू झाले अनावर 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केलेला असताना घरी पोचण्याचा हा जीवघेणा प्रवास पाच दिवसांपूर्वी सुरू झाला. स्थलांतरितांनी "सकाळ'शी संवाद साधताना सांगितले, की भिवंडी व परिसरातील क्षेत्रात मोलमजुरी करणारे हे सर्व मजूर आहेत. परिस्थिती सावरेल, या आशेने तेथेच थांबून होते. परंतु खाण्या-पिण्याची भ्रांत व्हायला लागली. हाती काम राहिले नाही, तर गावाकडे जाण्याची ओढ सर्वांना लागली. काही पायी, तर काही मिळेल त्या गाडीत बसून पुढे निघत होते. उत्तर प्रदेशमधील विविध ठिकाणच्या या मजुरांपैकी अनेकांच्या घरी म्हातारे आई-वडील, चिमुकले त्यांची प्रतीक्षा करत असल्याचे सांगताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. दरम्यान, नाशिक पोलिसांनी या स्थलांतरितांना बिस्किटे, पाणी व अन्य आवश्‍यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैणात करण्यात आला होता. 

Image may contain: 2 people, people sitting and outdoor

परिस्थिती लवकर सुधरावी, अशीच आमची अपेक्षा
खाण्या-पिण्याची व्यवस्था नसल्याने आम्ही घराकडे निघालो होतो. तिकडे आमची मुले रडत असून, इकडे आम्हालाही रडू येत आहे. भिवंडीहून चार दिवसांपूर्वी आम्ही निघालो होतो. कसेही करून घरी पोचावे इतकेच आम्हाला वाटत होते. - प्रकाश गौतम, स्थलांतरित 

हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

पंधरा दिवसांपासून जेवणाची गैरसोय झालेली होती. चार दिवस झालेत भिवंडीहून निघून, जे भेटेल ते खाऊन घरी पोचण्याची धडपड सुरू होती. काहीच रस्ता दिसत नसल्याने घरचेही प्रचंड तणावात आहेत. परिस्थिती लवकर सुधरावी, अशीच आमची अपेक्षा आहे. - विनोदकुमार प्रजापती, स्थलांतरित 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! 'ते' दोघं मज्जाक - मस्ती करत घराकडे निघाले...मात्र, वाटेत काळाने अडवलं


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to lockdown Migrants people leaving for Uttar Pradesh with tears Nashik Marathi News