वैद्यकीय अधिकारीमुळे वाचले दोन जीव! मध्यरात्री तीन किलोमीटरचा प्रवास करत सुखरूप प्रसूती

andarsool.jpg
andarsool.jpg

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे वाचले दोन जीव
मध्यरात्री तीन किलोमीटरचा प्रवास करत सुखरूप प्रसूती

नाशिक / अंदरसुल : मध्यरात्रीची वेळ, पावसाने वस्तीवर जाणाऱ्या सर्व रस्यावर चिखल अशा परिस्थितीत देखील रूग्णांचा जीव वाचविण्याकरीता डॉक्टरांनी थेट तीन किलोमीटरचे अंतर कापत दोन जीव वाचविले.

आरोग्य केंद्र तीन किललोमीटर दूर अंतरावर असल्याने मोठे संकट

पडेगाव रोडला राहत असलेल्या येथील शेतमजूर सोनाली अनिल गायकवाड या महिलेला गुरुवारी (ता. १३) पहाटे अचानक प्रसूतिकळा सुरू झाल्या. अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्र तीन किललोमीटर दूर अंतरावर असल्याने पती अनिल गायकवाड यांच्यावर मोठे संकट उभे राहिले, कारण शेतमजूर असल्याने अनिलजवळ ना मोबाईल ना कोणतेही वाहन. त्यामुळे आता पत्नीला रुग्णालयात कसे दाखल करायचे हा प्रश्‍न त्याच्यापुढे उभा राहिला. या वेळी अनिलने वस्तीशेजारील प्रमोद जगताप यांच्या मोबाईलवरून अंदरसूल येथील आरोग्य केंद्रात मध्यरात्री संपर्क साधत डॉ. आनंद तारू यांना ही परिस्थिती सांगितली.

मातेची प्रकृती खूप खालावली

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता डॉ. तारू यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यासोबत पहाटे अडीचला तीन किलोमीटर दूर असलेल्या वस्तीवर चिखलाच्या रस्त्यातून मार्ग काढत गायकवाड यांचे घर गाठले.
 दरम्यानच्या काळात मातेची प्रकृती खूप खालावली असल्याने रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात नेणेही शक्य नव्हते. त्यामुळे डॉ. तारू यांनी घरीच प्रसूती करण्याची जोखीम घेत सुखरूप प्रसूती केली. या वेळी नवजात बालकही सुखरूप असल्याची खात्री करून प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करून घेतले. विशेष म्हणजे डॉ. तारू यांनी कोरोना ड्यूटी सांभाळून ही समयसूचकता दाखविल्याने अंदरसूल येथील ग्रामस्थांनी डॉ. आनंद तारू यांचे आभार मानले.

समयसूचकता दाखवत ही रूग्णसेवा

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद तारू यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळेच हे शक्य झाले. डॉ. तारू यांनी कोरोना ड्यूटी सांभाळून समयसूचकता दाखवत ही रूग्णसेवा बजाविली.
 

रात्रीची वेळ, पाऊस सुरू. त्यातच चिखलातून तीन किलोमीटरचा रस्ता. गर्भवतीची प्रकृती अतिशय नाजूक असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेणे शक्य नव्हते. त्यामुळे घरीच प्रसूती करण्याचा निर्णय घेत यशस्वी प्रसूती केली.- डॉ. आनंद तारू, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंदरसूल

संपादन : कुणाल संत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com