राजीनामा दिल्याने शिवाजी चुंभळेंवरील टळली कारवाई; जिल्हा उपनिबंधकांचे बाजार समितीला पत्र 

shivaji chumble 1.jpg
shivaji chumble 1.jpg

म्हसरूळ (नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवाजी चुंभळे यांनी संचालकपदाच्या दिलेल्या राजीनाम्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. त्यांच्याविरुद्धच्या चौकशीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री १९६३ कायद्याच्या १७ व्या कलमानुसार चुंभळे यांच्यावर कारवाई करणे उचित ठरणार नसल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी बाजार समितीला दिले आहे. 


राजीनामा दिल्याने टळली कारवाई 
तत्कालीन सभपाती व संचालक मंडळाने केलेल्या आरोपांनुसार बाजार समितीच्या विरोधी संचालक गटाने माजी संचालक शिवाजी चुंभळे यांच्याविरुद्ध भूमिका घेतली होती. सुरवातीस सभेत मंजुरी मिळवत सह्यांचे अधिकार संचालक संपतराव सकाळे यांना देण्यात आले. धक्कातंत्र कायम ठेवत, अविश्वास ठराव मंजूर केला होता. माजी सभापती संपतराव सकाळे यांना मारहाण प्रकरण, इतर संचालकांना दमबाजी, शिवीगाळ व अडीच वर्षांच्या कालावधीत केलेल्या गैरकारभाराचा ठपका ठेवत संचालक मंडळाने शिस्तभंग कारवाईचा ठराव करीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री १९६३ कायदा, कलम १७ नुसार सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. असा अर्ज १२ फेब्रुवारीला जिल्हा उपनिबंधकांकडे केला होता. त्यानुसार वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावण्यादेखील झाल्या. यादरम्यान माजी संचालक शिवाजी चुंभळे यांनी १९ ऑक्टोबरला बाजार समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. तसा अहवाल बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविला होता.

चर्चा संचालक मंडळ व बाजार समितीत सुरू

अपिलाचा निर्णय येण्यापूर्वी चुंभळेंनी सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने कारवाई करता येणार नाही, अशा निर्णयाचे पत्र जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी बाजार समितीस दिले. चुंभळे यांचे संचालकपद रद्द होण्याची शक्यता असल्याने ही नामुष्की ओढवू नये म्हणून चुंभळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा संचालक मंडळ व बाजार समितीत सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com