तलाठी परीक्षेत बसविला डमी विद्यार्थी; तब्बल १७ महिन्यांनंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

चेतन चौधरी
Saturday, 31 October 2020

भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात दोघांनी संगनमत करून, त्याच्या नावाचे बनावट हॉलतिकीट तयार केले

भुसावळ : गत वर्षी तलाठी पदासाठी झालेल्या परीक्षेत बनावट हॉलतिकीट बनवून तोतया परीक्षार्थी बसविण्यात आल्याची घटना श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात घडली होती. या प्रकरणी चौकशीअंती शहर पोलिसांत तब्बल १७ महिन्यांनंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

तलाठी परीक्षेत डमी विद्यार्थी 
भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात विजयसिंग सुंदरडे हा परीक्षार्थी असताना त्याने मदन गुसिंग याच्याशी संगनमत करून, त्याच्या नावाचे बनावट हॉलतिकीट तयार केले व परीक्षा दिली होती. चौकशीत ही बाब निदर्शनास आल्यानंतर तब्बल सतरा महिन्यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव पेठकर तपास करीत आहेत.  

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

तब्बल १७ महिन्यांनंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक राहुलकुमार रतीलाल जाधव (वय ३१, रा. खोटेनगर, जळगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार विजयसिंग महसिंग सुंदरडे, मदन मानसिंग गुसिंगे (रा. राजेवाडी, पो. शेळगाव, ता. बदनापूर, जि. जालना) यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. २६ जुलै २०१९ ला शासनातर्फे तलाठी प्रवर्गासाठी परीक्षा घेण्यात आली होती. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dummy students in Talathi exam crime against both nashik marathi news