शहापूरच्या शेतकऱ्याने साधली किमया! वांग्याच्या पिकातून मिळवले चक्क चार लाख रुपये उत्पन्न

वासुदेव चव्हाण
Tuesday, 5 January 2021

जगभरात कोरोनाच्या सावटामुळे शेतमालासह सर्वच क्षेत्रांत मंदीचे वातावरण आहे. मात्र, अशाही स्थितीत येथील दत्तात्रय सननसे यांनी भरताच्या वांग्याचे चार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. 

शहापूर (नाशिक) : जगभरात कोरोनाच्या सावटामुळे शेतमालासह सर्वच क्षेत्रांत मंदीचे वातावरण आहे. मात्र, अशाही स्थितीत येथील दत्तात्रय सननसे यांनी भरताच्या वांग्याचे एकरी चार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. 

कोरोना संकटातही शहापूरच्या शेतकऱ्याने साधली किमया

 सननसे तीन वर्षांपासून भरताच्या वांग्याची लागवड करतात. या वर्षी त्यांनी एक एकर क्षेत्रावर पाच बाय पाच फूट अंतरावर भरताच्या वांग्याची दोन हजार रोपे लावली होती. त्यासाठी बामनोद येथील रमेश फेंगडे यांच्याकडून तीन वर्षांपूर्वी आणलेले घरगुती बियाणे वापरून रोपे तयार केली असून, त्यांची लागवड करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या काळात त्यांना तीन लाख पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, आणखी पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे चित्र आहे. दुसरीकडे या एक एकरावर आतापर्यंत केवळ नव्वद हजार रुपये खर्च झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

१३ जुलैला लागवड केल्याने नवरात्रीपासून माल सुरू झाला. दिवाळीपर्यंत प्रतिकिलो पस्तीस ते चाळीस रुपये भाव मिळाला. या एक महिन्यात चांगला भाव मिळाल्याने दोन लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. वांग्याची क्वालिटी चांगली असल्याने, भुसावळ परिसरातून दर वर्षी मोठी मागणी असते. -दत्तात्रय सननसे, शेतकरी  

हेही वाचा >  निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eggplant crop Income foue lakhs per acre nashik marathi news