कादवाची निवडणूक लांबणीवर; शासनाच्या आदेशाने इच्छुकांचा हिरमोड 

 election of the kadava factory has been postponed
election of the kadava factory has been postponed

दिंडोरी (जि.नाशिक) : दिंडोरी तालुक्याची सर्व राजकीय समीकरणे कादवा कारखान्यावर अवलंबून असतानाच पुन्हा कादवा कारखाना निवडणूक आता लांबणीवर पडली आहे. तसा आदेश सहकारी संस्थांना मंगळवारी (ता. १२) देण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुक सभासदांचा हिरमोड झाला आहे. 

पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ

कादवा कारखाना कार्यक्षेत्रात दिंडोरी व चांदवड तालुक्याचा भाग येतो. त्यात सर्व राजकीय समीकरणे कादवा कारखान्यावर अवलंबून आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचे संकट आले आणि राज्यातील सर्वच निवडणुकांना मुदतवाढ देण्यात आली. ज्या संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यांचा निवडणूक कार्यक्रम आहे त्या टप्प्यावर थांबविण्याचे आदेश देण्यात आले. यापूर्वी तीन महिन्यांची दिलेली मुदतवाढ संपुष्टात येत असताना नवीन वर्षात केव्हाही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता होती; परंतु मंगळवारी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. 

निवडणूक बिनविरोध

आगामी काळात कादवा कारखाना विकासासाठी निवडणूक बिनविरोध करण्याची गरज आहे. जर कादवा कारखाना अध्यक्ष श्रीराम शेटे, सुरेश डोखळे व प्रवीण जाधव एकत्र आले तर आगामी निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे सभासदांचे मत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com