esakal | 'सध्या कंगनापेक्षा तरुणांचा रोजगार महत्त्वाचा' - सत्यजित तांबे
sakal

बोलून बातमी शोधा

satyajeet tambe.jpeg

सहा महिन्यांत देशातील रोजगार मोठ्या प्रमाणात गेले असून, राज्यभरातील तब्बल तीन कोटी युवकांचा रोजगार हिरावला गेला असल्‍याचा दावा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला. सध्या कंगनापेक्षा युवकांना रोजगार मिळणे महत्त्वाचे असल्‍याचे त्यांनी शनिवारी (ता.१९) झालेल्‍या पत्रकार परिषदेत सांगितले.

'सध्या कंगनापेक्षा तरुणांचा रोजगार महत्त्वाचा' - सत्यजित तांबे

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणली आहे. सहा महिन्यांत देशातील रोजगार मोठ्या प्रमाणात गेले असून, राज्यभरातील तब्बल तीन कोटी युवकांचा रोजगार हिरावला गेला असल्‍याचा दावा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला. सध्या कंगनापेक्षा युवकांना रोजगार मिळणे महत्त्वाचे असल्‍याचे त्यांनी शनिवारी (ता.१९) झालेल्‍या पत्रकार परिषदेत सांगितले.

मोदी सरकारकडून अर्थव्‍यवस्‍था धोक्‍यात 
 
शहर जिल्हा युवक काँग्रेस बैठकीसाठी श्री. तांबे काँग्रेस कमिटीत आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारची खिल्ली उडवत आत्मनिर्भर भारत दिवास्वप्नच असल्याचे सांगितले. पक्षाचे शहराध्यक्ष शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल दिवे, महिला शाखा शहराध्यक्षा नगरसेविका वत्सला खैरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्‍वप्‍नील पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना चांगला रोजगार निर्माण होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

तर स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही परीक्षा होऊ नये, अशी काँग्रेसची भूमिका आहे. आता सर्वोच्च न्‍यायालयानेच आदेश दिल्याने राज्यपाल, कुलगुरूंनी विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने विद्यार्थीकेंद्रित भूमिका घ्यावी, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिक प्रवास करावा लागू नये, अशी मागणी श्री. तांबे यांनी केली. कोकण सुंदर असून, त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन क्षेत्रासाठी प्रयत्न झाल्यास स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचे श्री. तांबे यांनी सांगितले. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

जोरदार आतषबाजी 

मेळाव्यासाठी सायंकाळी पाचला श्री. तांबे यांचे आगमन झाले. त्या वेळी काँग्रेस कमिटीसमोर जोरदार आतषबाजी झाली. पक्षाच्‍या कार्यकर्त्यां‍‍नी श्री. तांबे यांचे स्‍वागत केले.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - किशोरी वाघ