PHOTOS : 'तिचे' प्रसूतीचे दिवस जवळ येताच साक्षात 'मृत्यू'ने आमंत्रण दिले...त्यात असे काही घडले की...

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 6 March 2020

अगोदर बाळाला की आईला वाचवायचे या प्रयत्नात अवघी रात्र डॉ. बोरसे व त्यांच्या टीमने जागून काढली. आईच्या शरीरात प्रतिजैविकांच्या माऱ्यातून जन्माला आलेले बाळ कसे असेल, या विचारात डॉ. बोरसे व त्यांच्या टीमचे सगळे वैद्यकीय कौशल्य पणाला लागले होते. आईचे रक्त गर्भाशयातून बाळाच्या शरीरात जाण्याचाही धोका होता आणि प्राणवायूचा मेंदूला पुरवठा झाला नसेल, अशा प्रश्‍नांचे काहूर डॉ. बोरसे यांना उपचारादरम्यान सतावत होते, तर दुसरीकडे दिवस भरत आलेल्या लेकीला नागाने दंश केल्याचे टेन्शन कुटुंबाला होते.

नाशिक/ नांदगाव : प्रसूतीचे दिवस जवळ आले असताना गर्भवतीला सर्पदंश झाला. मात्र, तिच्यासह बाळाचेही प्राण वाचविण्यात डॉ. रोहन बोरसे यांच्या प्रयत्नांना यश आले. यामुळे डॉ. बोरसे पुन्हा एकदा महिलांसाठी देवदूत ठरले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात ही घटना दुर्मिळ समजली जाते. त्या महिलेला कन्यारत्न झाले. आई व नवजात बाळ दोघेही सुखरूप आहेत. 

असा घडला प्रकार

गरोदर अनिता दत्तू बोरसे (वय 22) माहेरी साकोरा येथे आली. रात्री लघुशंकेसाठी बाहेर गेली असता, नजरचुकीने तिचा पाय सापावर पडला. हा साप चक्क कोब्रा जातीचा विषारी नाग होता. सापाने तिला दंश केला, म्हणून घरच्यांनी आवळपट्टी बांधून तिला ऊर्मी रुग्णालयात नेले. अनिताला चक्कर यायला लागल्याने डॉ. रोहन बोरसे यांनी प्रतिजैविके सुरू केली. डॉ. बोरसे यांनी आंतरराष्ट्रीय विषतज्ज्ञ डॉ. हिंमतराव बाउंसकर यांचे मार्गदर्शन घेतले. अगोदर बाळाला की आईला वाचवायचे या प्रयत्नात अवघी रात्र डॉ. बोरसे व त्यांच्या टीमने जागून काढली. आईच्या शरीरात प्रतिजैविकांच्या माऱ्यातून जन्माला आलेले बाळ कसे असेल, या विचारात डॉ. बोरसे व त्यांच्या टीमचे सगळे वैद्यकीय कौशल्य पणाला लागले होते. आईचे रक्त गर्भाशयातून बाळाच्या शरीरात जाण्याचाही धोका होता आणि प्राणवायूचा मेंदूला पुरवठा झाला नसेल, अशा प्रश्‍नांचे काहूर डॉ. बोरसे यांना उपचारादरम्यान सतावत होते, तर दुसरीकडे दिवस भरत आलेल्या लेकीला नागाने दंश केल्याचे टेन्शन कुटुंबाला होते.

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...

Image may contain: one or more people

आई विषमुक्त, तर बाळ सुखरूप; डॉ. रोहन बोरसे ठरले देवदूत 

कोब्राच्या विषाच्या नुसत्या कल्पनेने भल्याभल्यांची घाबरगुंडी उडाली होती. सुदैवाने अनिताच्या शरीरात विष भिनले जाऊ नये, म्हणून डॉ. रोहन बोरसे यांनी सुरू केलेल्या विषप्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या मेहनतीला यश आले. अनिताची प्रकृती स्थिर करण्यासोबतच तिच्या प्रसवकळा नियंत्रित झाल्या. अनिताने एका गोंडस कन्येला जन्म दिला. आई व बाळ दोघांनाही विषापासून मुक्त करण्यासाठी डॉ. बोरसे यांची उपाययोजना फलद्रूप ठरली. आईसोबत नवजात बाळाचेही प्राण डॉ. रोहन बोरसे यांना वाचविण्यात यश आले. या घटनेमुळे डॉ. रोहन बोरसे नांदगावकरांसाठी पुन्हा एकदा देवदूत ठरले. सध्या अनिताच्या पायांच्या जखमा कमी करण्यासाठी डॉक्‍टरांचे प्रयत्न सुरू आहेत.

Image may contain: outdoor

गुंतागुंतीच्या प्रसूती, बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळलेली नाळ दूर करणे, गर्भातील पाणी कमी झालेल्या गर्भवतींना सीझेरियनपासून वाचविणे आदी प्रकारात डॉ. रोहन बोरसे यांनी आपले नैपुण्य पणाला लावून विनासायास व त्याही मोफत प्रसूती करण्यात वेगळे कौशल्य यापूर्वीही दाखविले आहे. त्यांच्या या प्रयत्नाबद्दल डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार, नांदगावरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the end of the maternity days Saved from the cobra's bite Nashik Marathi News