मोरे बंधूची कमाल! लॉकडाऊनची साधली संधी..वर्षाला ५ ते ६ लाख रुपये मिळविण्याचा विश्वास...

ozhr
ozhr

नाशिक / ओझर : लॉकडाऊन काळात अनेकांचे काम गेले तर अनेकांना घरातून काम करण्याची संधी मिळाली आहे. व्यवसायाने अभियंता असलेले मनोज आणि अमोल मोरे हे बंधू लॉकडाऊनमुळे आपल्या शिरसगाव येथील घरी आले होते. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या उद्देशाने अभिनव प्रयोग राबविला.. ज्यामुळे त्यांना वार्षिक पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळेल असा आशावाद देखील यावेळी दोघा अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.

वाचा कसा केला वेळेचा सदुपयोग

कोरोनाच्या महामारीत अवघे जग लढत असताना शिरसगाव (ता. निफाड) येथील मनोज आणि अमोल मोरे या अभियंता बंधूंनी वेळेचा सदुपयोग केला आहे. कोरोनामुळे अनेकांचे काम गेले तर अनेकांना घरातून काम करण्याची संधी मिळाली आहे. व्यवसायाने अभियंता असलेले मनोज आणि अमोल मोरे हे बंधू लॉकडाऊनमुळे द्राक्ष काढणीकरिता आपल्या शिरसगाव येथील घरी आले होते. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी द्राक्षबागेत उन्हाळ्यात काकडीची आणि कोंथबिरीची लागवड केली. कोरोनाच्या महामारीत अवघे जग लढत असताना शिरसगाव (ता. निफाड) येथील मनोज आणि अमोल मोरे या अभियंता बंधूंनी वेळेचा सदुपयोग आणि तंत्रज्ञानाचा वार करत पाच एकर लावलेल्या द्राक्ष बागेतील एक एकर जागेत द्राक्षासह सीताफळ, काकडी, आणि कोथिंबीर अशी आंतरपिके घेऊन बहुपीक लागवड यशस्वी करून दाखवली. लागवड केलेल्या पिकांमधून वार्षिक पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळेल असा आशावाद देखील यावेळी दोघा अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.

वर्षाला पाच ते सहा लाख रुपये मिळतील असा विश्‍वास

यावेळी त्यांनी द्राक्षपिकात घेतलेल्या या दोन्ही पिके यशस्वीरीत्या आली आणि दीड ते दोन महिन्यात त्यापासून त्यांना उत्पन्न सुरू झाले. त्यातच मोरे बंधू यांनी एनएमके वन (१) जातीच्या सीताफळांची रोपे बार्शी (जि. सोलापूर) येथून आणून लवकर फळ येणाऱ्या जातीच्या अर्ली सीताफळांची १७ बाय सहा अशी लागवड केली. भविष्यात त्यापासूनही चांगले उत्पन्न मिळेल. पंधरा वर्षाची जुनी द्राक्षबाग फेब्रुवारी मध्येच ओलांडे कट करून केल्याने त्यांच्यावर चांगले पीक येणार असल्याने बाजारभाव चांगला मिळाला तर वर्षाला पाच ते सहा लाख रुपये मिळतील असा विश्‍वास मोरे बंधू यांनी व्यक्त केला आहे.

अभियंता बंधूचा शेतात अभिनव प्रयोग​

लॉकडाऊन काळात काम नव्हते. वेळेचा सदुपयोग व्हावा व घरचे कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून आम्ही हा प्रयोग केला व तो यशस्वी झाला. शेतकऱ्यांनी संकट काळात न थकता नवनवीन उत्पन्नाचे स्रोत शोधणे गरजेच आहे.- अमोल व मनोज मोरे (शिरसगांव)

रिपोर्ट -  उत्तम गोसावी

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com