नाशिककर म्हणताय...''फुल खिले है गुलशन गुलशन''... 

संदीप पवार : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

नाशिक्‍लबमध्ये कोलकाता, खरगपूर, डेहराडून, पुणे येथून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची रोपे मागवून ती वर्षभर वाढविली आहेत. यात मधल्या काळात अवकाळी पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसूनही शर्थीचे प्रयत्न करून गुलाबाची रोपे वाढविण्याची नाशिक्‍लबने मेहनत घेतली आहे. 

नाशिक : (डीजीपीनगर) गेल्या तीन वर्षांपासून नाशिक्‍लबतर्फे पुष्प प्रदर्शन भरविण्यात येत असून, या वर्षी नाशिक-पुणे रोडवरील नाशिक्‍लब येथे शुक्रवार (ता. 24)पासून ते 26 जानेवारीपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा, या वेळेत संपूर्ण भारतभरातून संकलित केलेल्या जवळजवळ एक हजार प्रकारच्या गुलाब फुलांच्या जाती पाहायला मिळणार आहेत. फुलझाडांचे पहिल्यांदाच प्रदर्शन भरविण्यात येणार असून, प्रदर्शनाचे उद्‌घाटन नाशिक्‍लबचे संचालक देवकिसन सारडा यांच्या हस्ते होणार आहे. पुष्पप्रेमी रसिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संदेश सारंग, राजू कटारे, विवेक वाणी यांनी केले आहे. 

Image may contain: one or more people, people standing, plant, tree and outdoor

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणात देखील  गुलाब फुलवले 

या प्रदर्शनाच्या तयारीसाठी नाशिक्‍लबमध्ये कोलकाता, खरगपूर, डेहराडून, पुणे येथून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची रोपे मागवून ती वर्षभर वाढविली आहेत. यात मधल्या काळात अवकाळी पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसूनही शर्थीचे प्रयत्न करून गुलाबाची रोपे वाढविण्याची नाशिक्‍लबने मेहनत घेतली आहे. 

हेही वाचा>रेल्वेस्थानकावर जोडीने फिरतोय 'तो'..जरा जपून!

Image may contain: 1 person, standing, plant, outdoor and nature

सेल्फी प्रेमींकरिता सेल्फी पॉइंट

प्रदर्शनाच्या अनुषंगाने नाशिक्‍लबतर्फे पुष्पप्रेमींकडे असलेल्या नावीन्यपूर्ण गुलाब रोपांचे प्रदर्शनात मांडणीसाठी आवाहन केले होते. त्यानुसार अशा गुलाबाच्या रोपांची मांडणी करता येणार असून, या प्रदर्शनात गुलाबांसोबत शेवंती, कॅलेनड्युला, सेलोसिया, ब्राझिलियटन बटरफ्लाय, इम्पेशन, सल्व्हिया, अडेनियम, डेलिया, बेगोनिया, जिरेनियम, डायनथस, ओरनामेंटल केले, पेटूनिया आदी फुलझाडांचे प्रकार प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत. प्रदर्शनात फुलांचा वेष परिधान केलेली अप्सरा आणि सेल्फी प्रेमींकरिता सेल्फी पॉइंटही उभारले आहेत.  

चिमुकल्यांसह शाळकरी  विद्यार्थ्यांनी सेल्फीचा आनंद घेतला

प्रदर्शनास विविध शाळेतील चिमुकल्यांसह शाळकरी  विद्यार्थ्यांनी भेट देऊन फुलांविषयी माहिती जाणून घेतली. फुलांबरोबरच पुष्प प्रेमी नाशिककर गुलाबपुष्पाने सजवलेल्या "रोज डॉल", पुष्पाने सजवलेली मलेशियन 'पोपटांची जोडी' व कल्पकतेने बनवलेल्या 'ख्रिसमस ट्री' या बरोबर देखील सेल्फीचा आनंद घेत आहेत
 

हेही वाचा>इगतपुरीच्या हातसडीच्या तांदळाची मुंबईत चलती!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exhibition of various roses in Nashikclub nashik marathi news