कौटुंबिक न्यायालयाचे खटले आता जुलैमध्येच..! लोकअदालतही पुढे ढकलली..

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 18 April 2020

मे महिन्यात होणारी लोकअदालतही जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्र शासनाने 3 मेपर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ केली आहे. त्यापूर्वी न्यायालयाने 14 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कामकाजात बदल केले होते. मात्र आता उच्च न्यायालयानेही लॉकडाउननुसार कौटुंबिक न्यायालयीन कामकाजाला मुदतवाढ दिली आहे.

नाशिक : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाउनमध्ये पुन्हा वाढ करण्यात आल्याने त्याचा न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कौटुंबिक न्यायालयातील खटल्यांचे कामकाज जुलैमध्ये होणार आहे.

लोकअदालतही पुढे ढकलली

एवढेच नव्हे, तर मे महिन्यात होणारी लोकअदालतही जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्र शासनाने 3 मेपर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ केली आहे. त्यापूर्वी न्यायालयाने 14 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कामकाजात बदल केले होते. मात्र आता उच्च न्यायालयानेही लॉकडाउननुसार कौटुंबिक न्यायालयीन कामकाजाला मुदतवाढ दिली आहे. 16 एप्रिल ते 4 मे या दरम्यानच्या खटल्यांसाठी 2 जुलै ते 18 जुलै या कालावधीतील तारखा देण्यात आल्या आहेत.  

कोरोनामुळे निर्णय जुलैमध्येच

शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गोविंदनगर परिसरात आढळून आला. त्यानंतर नवश्‍या गणपती, नाशिक रोड येथील तरण तलाव परिसर, नाशिक- पुणे महामार्गावरील समाजकल्याण विभागाचे निवारा केंद्र व अंबड येथील संजीवनगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महापालिकेतर्फे पाचशे मीटरचा परिसर 14 दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आला. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family court cases now in July nashik marathi news