परराज्यातील हार्वेस्टरला दिला नकार!...इथं 'शेतकरी'च झाले हार्वेस्टरचे मालक

harvester.jpg
harvester.jpg

नाशिक : (मुखेड) दरवर्षी परराज्यातील पंजाब, हरियाना येथून असंख्य हार्वेस्टर येवला तालुक्‍यात रब्बी हंगामात गहू सोंगणीच्या काळात येतात. ठिकठिकाणी हार्वेस्टरचा व्यवसाय करून परराज्यातील हार्वेस्टरचालक परततात. हे स्थानिक शेतकरीपुत्रांनी हेरत स्वतःच हार्वेस्टरचे मालक होण्याचा निश्‍चय केला. यामध्ये प्रामुख्याने जळगाव नेऊर येथील शिवाजी शिंदे, श्रीदेव शिंदे, नेऊरगाव येथील उद्धव बोराडे, तुषार बोराडे या शेतकरी पिता-पुत्रांनी निवडलेल्या या व्यवसायाचे कौतुक होत आहे.

एकरीप्रमाणे व कमी वेळात गहू काढणीसाठी हार्वेस्टरला वाढती मागणी

पावसाळ्यात निसर्गाची मिळालेली साथ, झालेला योग्य पाऊस, पालखेडचे मिळालेले आवर्तन यामुळे मुखेड, जळगाव नेऊर परिसरात खरीप व रब्बी पिकांचे योग्य नियोजन करण्यात आले. यंदा पाण्याची उपलब्धता असल्याने रब्बी पिकांमध्ये शेतकरीवर्गाने कांदा, ज्वारी, गहु व हरभरा आदी पिकांना पसंती दिली. लाल व उन्हाळ कांदा पिका बरोबर गव्हाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. गहू काढणीसाठी वाढलेली मजुरी व वेळ खर्ची करण्यापेक्षा दोन हजार रुपये एकरीप्रमाणे व कमी वेळात गहू काढणीसाठी हार्वेस्टरला वाढती मागणी आहे. 

शेतकरीपुत्रांनी लाखो रुपये गुंतवणूक करून नवीन हार्वेस्टर घेण्यास दिली पसंती

मागील काही वर्षांत परराज्यातील हार्वेस्टर मुखेड, जळगाव नेऊर परिसरात हजेरी लावत; परंतु गव्हाचे उत्पादन नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागत असे. यंदा मात्र, गव्हाचे उत्पादन चांगले होण्याची स्थिती असल्याने येथील शेतकरीपुत्रांनी लाखो रुपये गुंतवणूक करून नवीन हार्वेस्टर घेण्यास पसंती दिली. मागील काही वर्षांत गव्हाचे उत्पादन महाराष्ट्र राज्यात कमी होते. त्यामुळे ग्राहकांबरोबर नाईलाजाने शेतकऱ्यांनही रेशनवरील व परराज्यातील गहू खरेदी करण्याची वेळ आली होती. 

शेतकऱ्यांनी निव्वळ शेती व्यवसायावर अवलंबून न राहता शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याची गरज आहे. त्यातून कुटुंबाला हातभार लागण्यास मदत होईल. - उद्धव बोराडे व तुषार बोराडे, हार्वेस्टरमालक, नेऊरगाव 

जीवनात यशस्वी होण्यासाठी पारंपरिक शेतीबरोबरच प्रयोगशील शेती लाभदायी आहे. मात्र यासाठी वेगवेगळ्या शेतीपूरक व्यवसायाची निवड करून शेतकरीपुत्रांनी आपली प्रगती साधावी. - शिवाजी शिंदे व श्रीदेव शिंदे, हार्वेस्टरमालक, जळगाव नेऊर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com