वाह शेतकरी दादा! जुन्या इंजिनला स्पेअरपार्टची जोड देत केला आविष्कार...कसे ते वाचाच

yeola1.jpg
yeola1.jpg

नाशिक / येवला : गरज ही शोधाची जननी असते, असे नेहमीच सांगितले जाते. मात्र याचा नुकताच प्रत्यय आला आहे एका यंत्राच्या आविष्कारातून... बैल नाही, आपण नोकरी करतो मग शेती कशी करणार? अशा प्रश्नांनी मनात काहूर उठले अन् यातूनच स्वत:च्या सर्जनशीलतेचा वापर करून जुन्या इंजिनला विविध स्पेअरपार्टची जोड देऊन कसे साकारले ते एकदा वाचाच...

अधिकारी - शेतकऱ्यांत क्रेज 

एका शेतकऱ्याने कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांवर औषध फवारणी, पेरणी, पाळी, कोळपणी, खुरपणी ही कामे करणारे बहुपयोगी शेतकरीराजा पॉवर टिलर मीनी ट्रॅक्टर हे होममेड अनोखे यंत्र बनवले आहे. मका, कपाशी व सोयाबीन आदी पिकांची खुरपणी मजुराअभावी घरीच करावी लागते. भोरकडे व त्यांचे बंधु दोघेही श्री. साईबाबा संस्थन शिर्डी येथे नोकरीला असल्याने कमी श्रमात मशागतीसाठी विविध पद्धतीची यंत्र युट्यूबला शोधल्यावर त्यांना पिटर इंजीनवर चालणाऱ्या या नव्या यंत्राची कल्पना सुचली. लहानपणापासून भोरकडे यांना कोणतेही यंत्र खोल-फिटींग करण्याची खूप आवड असल्याने त्यांनी कल्पना लढवत जिद्दीने हे यंत्र तयार केले. त्यामुळे अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये या यंत्राची क्रेज तयार होत आहे. 

असे तयार झाले यंत्र... 

घरात एक जुनं पिटर इंजिन होतं. ते वापरुन व युट्युबवर पाहून भोरकडे यांनी प्रयोग करायला सुरुवात केली. यंत्रासाठी लागणाऱ्या स्पेरअरपार्टची कोपरगाव, येवला, राहाता व अहमदनगर इथे शोधा-शोध सुरू झाली. हळूहळू लागणारे सगळे स्पेअरपार्ट मिळाले. यासाठी केलेला सुरुवातीचा प्रवास कधी लाभदायक तर कधी त्रासदायक होता. पण त्‍यांनी हार मानली नाही. सुट्टीच्या दिवशी शेतातील कामं करुन राहिलेल्या वेळेत यंत्राचं काम सुरू झालं. अखेर तीन महिन्यात यंत्र तयार झालं. यंत्राचं पहिलं प्रात्यक्षिक त्यांच्याच शेतात घेतलं आणि ते यशस्वी झालं. या यंत्रासोबत वखर, फन व बळी साहित्य‍ असुन यंत्राव्दारे कपाशी, मका या पिकांत वखर फन व औषध फवारणी करता येते. यासाठी त्यांना अवघे 28 ते 30 हजार रुपये खर्च आला आहे. 

शेतीमध्ये बचत हाच मंत्र 

यंत्रांची आवड असल्याने जिद्दीने नवे व आपल्या कामाचे यंत्र बनविण्याचा चंग बांधला अन तो पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. लहान शेतकऱ्यांनी असाच नवनविन यंत्रांचा वापर करावा. शेतीमध्ये बचत हाच मंत्र असुन उत्पन्नात वाढ तर खर्चात बचत केल्यास शेतकरी समाधानाने राहील. अंतरमशागतीच्या साधनांना तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली तर शेतीमध्ये भरभराट नक्की होईल. या प्रयोगासाठी आई, भाऊ आणि परिवाराची खंबीर साथ मिळाल्याचे यंत्र साकारणारे शेतकरी अनिल भोरकडे यांनी सांगितले. 

अनेकांच्या उपस्थितीत उद्घाटन 

तर यंत्राचे उद्घाटन करताना पंचायत समितीचे सभापती प्रविण गायकवाड यांनी शेतकरी बांधवांनी तांत्रिक पद्धतीची शेती केल्यास शेतीत खर्च कमी होऊ शकतो. आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नात वाढवण्यासाठी मदत होईल. अनिल भोरकडे सारख्या शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करून हे यंत्र बनवले हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, कृषि अधिकारी प्रशांत वास्ते, श्रीमती आहेर, डॉ. सुरेश कांबळे आदींची उपस्थिती होती. 

पिंपळगाव जलाल : येथील अनिल भोरकडे या शेतकऱ्याने बनवलेल्या बहुपयोगी मीनी ट्रॅक्टरचे उद्घाटन करताना पंचायत समितीचे सभापती प्रविण गायकवाड, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, कृषि अधिकारी प्रशांत वास्ते आदी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com