PHOTOS : कांदा निर्यात बंदीविरोधात शेतकरी व व्यापाऱ्यांचा संताप; केंद्र शासनाच्या भुमिकेच्या निषेधासाठी रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकऱ्यांकडे पडून आहे. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा हा निर्यातिसाठी सीमेवर अड़कुन पडला आहे. त्यासाठीहि सीमा खुली करावी. कांदयाच्या किमती खुप वाढल्या नसून अजूनही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात असल्याने तातडीने निर्यात बंदी उठवणे गरजेचे आहे.

नाशिक : कांद्याने सोमवारी (ता.१४) पिंपळगाव बाजार समितीत चार हजार रूपये प्रतिक्विंटल असा आकर्षक भाव खाल्ला असताना केंद्र शासनाच्या डोळ्यांतही बाब खुपलेली दिसते. बांग्लादेशच्या सीमेवर व मुंबईच्या जे.एन.पी.टी बंदरावर होणारी निर्यात तुर्त थांबविली आहे. त्यामुळे १८ हजार टन कांदा निर्यातीअभावी खोळंबला आहे. कांद्याची निर्यात रोखुन दर आवाक्यात ठेवण्याचा निर्णय केंद्र शासन घेण्याच्या पवित्र्यात असल्याने त्याचा दबाव दुपारच्या सत्रात कांदा लिलावावर झाला. तासाभरात एक हजार रूपयांनी दर कोसळले असुन तीन हजार रूपये क्विंटलपर्यंत घसरले. केंद्र शासनाच्या भुमिकेने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

कांदयावरील निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी याकरिता खा.डॉ.भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील माझ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात बहुसंख्य शेतकरी कांदा उत्पादक असून येथे मोठ्या प्रमाणात दर्जेदार कांदा पिक घेतले जाते. येथील शेतकऱ्यांची त्यावर अवलंबून असलेल्या व्यापारी वर्गाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांदयावर अवलंबून आहे. सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकऱ्यांकडे पडून आहे. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा हा निर्यातिसाठी सीमेवर अड़कुन पडला आहे. त्यासाठीहि सीमा खुली करावी. कांदयाच्या किमती खुप वाढल्या नसून अजूनही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात असल्याने तातडीने निर्यात बंदी उठवने गरजेचे आहे.

कांदयावरची निर्यातबंदी त्वरित उठवावी

आधीच लॉकडाउनच्या संकटकालातुन शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असतांना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल व त्यांचे मोठे नुकसान होईल. ह्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करुन आपण कांदयावरची निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतुकदार यांना दिलासा द्यावा असे निवेदन खा.डॉ.भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुषजी गोयल यांना दिले असून लवकरच ह्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन विचार विनिमय करुण निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

दीड तासपासून आंदोलन सुरू, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची शेतकऱ्यांची भूमिका..

-सटाणा येथे आज सकाळी 9 वाजता बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

-उमराणें येथेही कांदा निर्यात बंद विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना ,व इतर काही संघटनांचे एकत्रित आंदोलन झाले. प्रशासनास निवेदन देण्यात आले.

-आज 11.30 वाजता नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना कांदे भेट देऊन निर्यात बंदीचा निषेध नोंदवणार ..
प्रदेशाध्यक्ष  :  संदीप जगताप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers and traders angry over onion export ban nashik marathi news