VIDEO : सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांचे आमदार कोकाटे यांना साकडे

गौरव परदेशी
Sunday, 25 October 2020

आमदार कोकाटे यांनी पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव, खेड, परदेशवाडी, इंदोरे, वासाळी, बारशिंगवे, शिरेवाडी, टाकेद, अडसरे, भरवीर आदी भागात शनिवारी (ता. २४) नुकसानीची पाहणी केली.

नाशिक : (खेडभैरव) इगतपुरी तालुक्यासह पूर्व भागातील खेड-टाकेत गटात करपा, मावा, तुडतुडा रोगाने भात पीक वाया गेलेले असतानाच परतीच्या पावसाने पिके अक्षरशः आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून तातडीने जास्तीत जास्त नुकसानभरपाई आणि सरसकट पीकविमा द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार कोकाटे यांच्याकडे केली. 

आमदार कोकाटे यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी 

शासनाकडे आपण पत्रव्यवहार केला असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई व विमा कंपन्यांकडून विमे मिळविण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार कोकाटे यांनी दिली. आमदार कोकाटे यांनी पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव, खेड, परदेशवाडी, इंदोरे, वासाळी, बारशिंगवे, शिरेवाडी, टाकेद, अडसरे, भरवीर आदी भागात शनिवारी (ता. २४) नुकसानीची पाहणी केली. नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे, तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर, सर्व मंडळ अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, पांडुरंग वारुंगसे, महेश गाढवे, पंढरीनाथ बऱ्हे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे पूर्णतः नुकसान झाले असून, पंचनामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई आणि पीकविमे मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. - माणिकराव कोकाटे, आमदार  

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers demand compensation from MLA Kokate nashik marathi news