गिरणारेत पेन्शनरांचे खाते गोठवले! शेतकरी, निवृत्तिवेतनासाठी एकच खाते

विनोद बेदरकर
Monday, 25 January 2021

जिल्हाभर थकबाकीदार शेतकऱ्यांकडील थकबाकीची वसुलीही जोरात सुरू आहे. जिल्हा बँकेने कर्जदार शेतकरी असलेल्या खातेदारांची माहिती विविध राष्ट्रीयीकृत बँकांना कळविली आहे. त्यानुसार थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे खाते गोठविले गेले आहे.

नाशिक : लॉकडाउनपाठोपाठ अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, अनेकांचे कर्ज थकलेले असताना थकबाकीदार असलेल्या खातेदारांचे खाते जिल्हा बँकेच्या सूचनेनुसार गोठविले आहे. 

७१ खाते थकबाकीदार म्हणून गोठविली

शेतकरी असले तरी काही जण निवृत्त कर्मचारी असून, त्यांचेही निवृत्तिवेतन खाते बंद झाले आहे. तालुक्यातील एकट्या गिरणारे गावात साधारण ७१ खाते राष्ट्रीयीकृत बँकेने थकबाकीदार म्हणून गोठविली आहेत. थकबाकीदार शेतकरी म्हणून गोठविलेल्या खात्यात संबंधितांची निवृत्तिवेतनाची रक्कम जमा होते. त्यामुळे आता निवृत्तिवेतन मिळणेही बंद झाले आहे. अवकाळी पावसामुळे हैराण झालेल्यांत अनेकांना विविध व्याधी झाल्या आहेत, तर काहींच्या घरी मुलींचे विवाह आहे. मात्र, आता निवृत्तिवेतनही बंद झाल्याने सगळीच अडचण झाली आहे. 

दोन्ही खात्यांसाठी एकच बँकेचे खाते

जिल्हाभर थकबाकीदार शेतकऱ्यांकडील थकबाकीची वसुलीही जोरात सुरू आहे. जिल्हा बँकेने कर्जदार शेतकरी असलेल्या खातेदारांची माहिती विविध राष्ट्रीयीकृत बँकांना कळविली आहे. त्यानुसार थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे खाते गोठविले गेले आहे. मात्र, त्यात अनेक शेतकरी असे आहेत, की जे शासकीय सेवेत होते. निवृत्तीनंतर त्यांना निवृत्तिवेतन सुरू झाले आहे. मात्र, दुसरीकडे ते थकबाकीदार शेतकरी असल्याने आणि दोन्ही खात्यांसाठी एकच बँकेचे खाते दिलेले असल्याने सगळाच घोळ झाला आहे. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

एकाच खात्यामुळे पेच 

बँकांनी खाते गोठवल्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना त्यांनी शासकीय कर्मचारी म्हणून बजावलेल्या सेवेचे निवृत्तिवेतन मिळणे अवघड होऊन बसले आहे. दरम्यान, गिरणारेत पस्तीस वर्षांत प्रथमच असे प्रकार घडल्याने काही कुटुंबातील विवाह थांबल्याचे या भागातील सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त कर्मचारी पुंडलिक थेटे यांनी सांगितले.  

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers, pensions have a single account in girnare nashik marathi news