शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्रीचा 'नवा पॅटर्न'...तब्बल १०४ कोटींची उलाढाल!

farmer to customer.jpg
farmer to customer.jpg

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना आतापर्यंत १०४ कोटींचा २६ हजार ६४५ टन शेतमाल विकला आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाच हजार ४० टन तांदळासह धान्याचा समावेश असून, त्याखालोखाल तीन हजार ९७९ टन कांदा शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना दिला आहे. 

आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव कमी

जिल्ह्यातील ४० हजार ७६३ हेक्टरवर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. या क्षेत्रातून उत्पादित झालेला आठ लाख ९२ हजार ५५ टन भाजीपाला शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणतात. जिल्ह्यातील शेतकरी १६ हजार ९९३ हेक्टरमधून सव्वाचार लाख टन टोमॅटोचे, ८१७ हेक्टरमधून आठ हजार टन भेंडीचे, तर २२ हजार ९५३ हेक्टरमधून साडेचार लाखांहून अधिक इतर भाजीपाल्याचे उत्पादन निघते. मध्यंतरी आवक कमी असल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले होते. आज मात्र आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव कमी झाले आहेत. 

कोथिंबिरीची जुडी ४८ ते ६० रुपयांपर्यंत

सर्वसाधारणपणे ८० ते १०० रुपये किलो भावाने मिळणाऱ्या भाजीपाल्याला आता ६० रुपये द्यावे लागतात. कोथिंबिरीची जुडी ४८ ते ६० रुपयांपर्यंत पोचली होती. आज ती ३५ रुपयांमध्ये विकली गेली. जुडीचा भाव रुपयांमध्ये असा : मेथी- २२, शेपू- १८, पालक- साडेचार, पुदिना- दोन. इतर भाजीपाल्याचे भाव रुपयांमध्ये याप्रमाणे : मुळा (किलो)- १९, टोमॅटो- २३, वांगी- ३३, फ्लॉवर- १५, कोबी- १०, ढोबळी मिरची- ५०, भेंडी- १७, भोपळा- १०, कारले- १६, दोडका- ४२. 

दहा हजार शेतकऱ्यांचा सहभाग 

थेट ग्राहकांना शेतमाल विकण्याच्या उपक्रमात दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग राहिला आहे. त्यात वैयक्तिक सात हजार, तीस शेतकरी उत्पादक कंपनी, १७५ शेतकरी गटांचा समावेश होता. एप्रिलपासून ते आतापर्यंत शेतकरी थेट ग्राहकांना शेतमाल विकत आहेत. आता ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी शेतकऱ्यांना अडथळा राहिला नसल्याने शेतकऱ्यांची थेट ग्राहकांना शेतमाल विकण्यासाठी संख्या वाढीस लागली आहे. 

थेट ग्राहकांना विकलेला शेतमाल 
(आकडे टनामध्ये) 

द्राक्षे : दोन हजार ३१८ 
कलिंगड, खरबूज : दोन हजार ६५३ 
इतर फळे : दोन हजार ७०० 
कोबी-फ्लॉवर : एक हजार ८५७ 
टोमॅटो : ६६३ 
वांगी : एक हजार ३२८ 
कारली, दोडके, गिलके : एक हजार ५३० 
ढोबळी मिरची : दोन हजार ५०० 
इतर भाजीपाला : दोन हजार १२२  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com