भयानक! काळ अगदी समोर होता.. पण गाडी होती म्हणून...!

रोशन भामरे : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 25 February 2020

वटार (ता. बागलाण) येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. बिबट्या शेतकऱ्यांना मुक्त दर्शन देत असल्याने चार दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी वनपाल, अधिकाऱ्यांना दिली असता वन विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. बिबट्यामुळे दर वर्षी दहा ते बारा मेंढ्यांचा बळी जात असल्याने तत्काळ पिंजरा लावावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. 

नाशिक / तळवाडे दिगर : बिबट्या गावमा शे अशी चर्चा व्हती... तेनामुळे वावरमाईन सात वाजता घरकडे निघनू... थोडं पुढं गऊ... बिबट्या थेट मनी गाडीसमोरच उना... काय करू काही सुचनं न्हई... पण गाडीले किक मारी आणि आरोळ्या मारत गावमा उनू... हे सांगत होते बिबट्याचा थरार अनुभवलेले वटार गावातील शेतकरी रामदास जाधव आणि शेखर खैरनार. 

वटारच्या शेतकऱ्यांनी अनुभवला बिबट्याचा थरार 

वटार (ता. बागलाण) येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. बिबट्या शेतकऱ्यांना मुक्त दर्शन देत असल्याने चार दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी वनपाल, अधिकाऱ्यांना दिली असता वन विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. बिबट्यामुळे दर वर्षी दहा ते बारा मेंढ्यांचा बळी जात असल्याने तत्काळ पिंजरा लावावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. 

Image may contain: one or more people and outdoor

PHOTOS : सिग्नलवरील "ते' शेवटचे सेकंद अन् ऑडीचालकाची घाई..थराराक!
काल सायंकाळी सातला गावातून घराकडे जात असताना दोन बिबट्यांनी दर्शन दिले. त्यांच्या मागे हॉर्न वाजवत आणि आरडाओरडा करून जीव वाचविला. माझ्याकडे गाडी होती म्हणून जीव वाचला. त्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा. -रामदास जाधव, शेतकरी, वटार 

No photo description available.

हेही वाचा > हृदयद्रावक! रक्ताच्या थारोळ्यात असूनही "माऊलीची" बाळाची घट्ट मिठी सुटली नव्हती...अखेर..

गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या शिवारात बिबट्याचा वावर आहे हे ऐकून होतो. पण काल सायंकाळी मळ्यातून घरी जात असताना डरकाळी फोडली. बिबट्या समोर असताना डोळ्यासमोर साक्षात मृत्यू दिसत होता. मात्र हिमतीने गाडीला किक मारून पळालो. -शेखर खैरनार, शेतकरी, वटार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmers of Vatar experienced the horror of leopard Nashik Marathi News