esakal | दोन लाखांवरील कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा; शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन  

बोलून बातमी शोधा

cm and farmer.jpg

थकबाकीदार शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देऊन सहा महिने झाले. पण, अद्यापही दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नसल्याने या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे

दोन लाखांवरील कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा; शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन  
sakal_logo
By
प्रविण खैरनार

सायगाव (जि.नाशिक) : थकबाकीदार शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देऊन सहा महिने झाले. पण, अद्यापही दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नसल्याने या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिल्यानंतर तिचा मोठा लाभ होऊन अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. पण, अनेक वर्षांपासून कर्जाने ग्रासलेल्या दोन लाखांवरील थोडेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. शासनाने दोन लाखांवरील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्‍वासन दिले; पण अद्यापही कार्यवाही होत नसल्याने इतर पैसे मिळविण्याचे स्त्रोत बंद झाल्याने या शेतकऱ्यांना व्याजाने पैसे काढून शेतीसाठी वापरावे लागत आहेत. यंदा जास्त पावसाने सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता हातात काहीच राहिले नसल्याने मोठ्या विवंचनेत हे शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी करून कर्जमुक्त करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे युवक आवाडीचे तालुकाध्यक्ष अरुण जाधव व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन देऊन केली आहे. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

मोठ्या विवंचनेत हे शेतकरी

कधी दुष्काळ, तर कधी अवकाळीमुळे अनेक वर्षांपासून शेतकरी थकबाकीदार आहेत. दोन लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. पण, दोन लाखांवरील कर्ज असणारे शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे मोठे हाल होत आहे. तरी शासनाने त्यांना त्वरित कर्जमाफी देऊन कर्जमुक्त करावे. - सुनील देशमुख, माजी सरपंच, सायगाव  
 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल