धक्कादायक.. जन्मदात्यानेच घोटला तरूण मुलाचा गळा..परिसरात खळबळ

yeola murder.png
yeola murder.png

नाशिक / येवला : येवला तालुक्यातील गोपीनाथ अहिरे हा मुलगा गोकुळ व इतर कुटुंबियांसोबत राहत होता. पण रात्री असे काही घडले की खुद्द जन्मदाता पित्यानेच आपल्या तरुण मुलाचा गळा घोटला.या घटनेमुळे येवला परिसरात खळबळ उडाली आहे.

असा घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील गोपीनाथ अहिरे हा मुलगा गोकुळ व इतर कुटुंबियांसोबत राहत होता. रात्री पिता-पुत्रात किरकोळ कारणावरून वाद झाला. पाहता-पाहता वाद इतक्या विकोपाला गेला की रागाच्या भरात पित्याने आपल्या पोटच्या तरुण मुलाचा दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे,पोलीस निरीक्षक अनिल भवरी यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी पित्याला अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि विचारपूस केली असता आपणच मुलाचा खून केल्याचा कबुली जबाब त्याने दिल्याचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे यांनी सांगितले आहे.

खुनाचा गुन्हा दाखल
याप्रकरणी येवला तालुका पोलीस स्थानकात आरोपी गोपीनाथ विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मात्र क्षुल्लक कारणावरून जन्मदात्या पित्यानेच मुलाचा खून केल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून जन्मदाता पित्याने तरुण मुलाचा दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना येवल्यामध्ये घडली आहे. गोकुळ आहिरे असे या मुलाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गोपीनाथ आहिरे याला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com