फेलोशिप, सर्टिफिकेट कोर्ससाठी अर्जाची बुधवारपर्यंत मुदत

fellowship.jpg
fellowship.jpg

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे राज्‍यभरातील प्रशिक्षण केंद्रांमार्फत फेलोशिप व सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्‍ध करून दिले जातात. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता या शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशाकरिता ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बुधवार (ता. २०)पर्यंत मुदत दिलेली आहे. 

आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया सुरू 

आरोग्‍य विद्यापीठाने कौशल्‍य विकास व ज्ञान अद्ययावत करण्याच्‍या अनुषंगाने फेलोशिप व सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्‍ध करून दिलेले आहेत. वैद्यकीय शिक्षण घेतलेले उमेदवार, वैद्यकीय शिक्षणात कार्यरत अध्यापकांसह अन्‍य पात्र उमेदवारांना पात्रता पूर्ण करताना या शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्‍ध असते. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता फेलोशिप व सर्टिफिकेट कोर्सेसच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन स्‍वरूपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यापीठाने संलग्‍न असलेल्‍या प्रशिक्षण केंद्र (ट्रेनिंग सेंटर) सविस्‍तर यादी व प्रवेशाचे सविस्‍तर वेळापत्रकदेखील जारी केलेले आहे. त्‍यानुसार उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे. हे सर्व शिक्षणक्रम पूर्ण वेळ असून, उपस्‍थितीसंदर्भातील नियमावलीचे पालन पूर्ण केलेल्‍या उमेदवारांना परीक्षेसाठी पात्र ठरविले जाणार आहे. निवडप्रक्रिया व निकष यांसह प्रवेशासंदर्भातील सविस्‍तर अटी व शर्ती विद्यापीठाने संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. 

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक 

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २० जानेवारीपर्यंत 
अर्जाची प्रत विद्यापीठाला सादर करण्याची मुदत २५ जानेवारीपर्यंत 
अर्जाची छाननी प्रक्रिया ११ फेब्रुवारीपर्यंत 
तात्‍पुरती प्राथमिक गुणवत्तायादी जाहीर होणार १६ फेब्रुवारीला 
हरकती, सूचना नोंदविण्याची मुदत १६ ते १९ फेब्रुवारी 
तात्‍पुरती गुणवत्तायादी जाहीर होणार २५ फेब्रुवारी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com