PHOTOS : पांडवलेणी डोंगरावर आग; वनविभाग कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी टळला अनर्थ

प्रमोद दंडगव्हाळ
Saturday, 28 November 2020

येथील  पांडवलेणी डोंगरावर पहाटे अचानक आग लागली, ती विझविण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या आगीत जवळपास दीड एकर क्षेत्र असलेल्या जागेवरील पालापाचोळा यावेळी जळून खाक झाला आहे.

सिडको (नाशिक) : येथील  पांडवलेणी डोंगरावर पहाटे अचानक आग लागली, ती विझविण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या आगीत जवळपास दीड एकर क्षेत्र असलेल्या जागेवरील पालापाचोळा यावेळी जळून खाक झाला आहे.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

शनिवारी पहाटे फिरायला गेलेल्या पर्यटकांनी जळती सिगारेट फेकल्याने पांडवलेणीच्या टेकडीवर आग लागली असल्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून तातडीने ती विझविण्यात आली आहे. वेळीच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. आग विझविण्या करिता वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एस. डमाळे, वनपरिमंडळ अधिकारी डी. पी. बोरसे, वनपरिमंडल अधिकारी राहुल वाघ, एन. सी. कोकणी, एस. एस. जाधव, बी. आर. ठाकरे, एम. के. गावित, एस. गायकवाड सर्व वनसेवक पांडवलेणी येथे प्रयत्न केले.

 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire broke out on Pandavaleni hill nashik marathi news