फटाक्यांना आळा, कोरोनाला टाळा; राष्ट्रवादी युवकची शपथ घेऊन जनजागृती 

Firecracker-free Diwali this year
Firecracker-free Diwali this year

नाशिक :  कोरोनाला रोखण्यासाठी यंदाच्या दिवाळी प्रदूषणात भर घालणाऱ्या फटाक्यांना आळा घालून साजरी करावी, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी (ता.९) शिवाजी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फटाके न फोडण्याची शपथ घेत जनजागृती मोहीम सुरू केली. 

यंदा फटाकेमुक्त दिवाळी

भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आहे. ही लाट रोखण्यासाठी विविध स्तरावरून उपाययोजना सुरू आहेत. शहरात थंडीची लाट सुरू झाली असून, कोरोनाला पोषक थंडीत सर्दी, खोकला या आजारांसह विविध संसर्गजन्य आजार वाढत असताना कोरोना रोखत प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोडला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शपथ घेत फटाक्यांना आला घालण्याचे आवाहन केले.

 शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे किरण पानकर, डॉ. संदीप चव्हाण, बाळा निगळ, मुकेश शेवाळे, विशाल डोके, रामदास मेदगे, नीलेश भंदुरे, राहुल कमानकर, तुषार दिवे, कल्पेश कांडेकर, प्रदीप महाजन, मिलिंद सोळंके, रोहित जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके न फोडण्याची शपथ घेत जनजागृती सुरू केली. 

शहरात प्रत्येकाने कोरोनासंबंधीचे नियम पाळावेत व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आवाहन आहे. 
- अंबादास खैरे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com