धक्कादायक.. शहर पोलिसात पहिला पोलिस बळी..पोलिसांमध्ये शोककळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

गेल्या तीन आठवड्यांपासूनची कोरोनाविरोधातील त्यांची झुंज अपयशी ठरल्याने शहर पोलिस दलात कोरोनामुळे पहिला बळी आहे. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयातील आत्तापर्यत 12 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, सात रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

नाशिक / इंदिरानगर : गेल्या तीन आठवड्यांपासूनची कोरोनाविरोधातील त्यांची झुंज अपयशी ठरल्याने शहर पोलिस दलात कोरोनामुळे पहिला बळी आहे. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयातील आत्तापर्यत 12 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, सात रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर, पाच जणांवर उपचार सुरू आहेत. टोंगारे यांच्या निधनामुळे शहर पोलिसांमध्ये शोककळा पसरली आहे. 
 

शहर पोलिसात पहिला पोलिस बळी
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील इंदिरानगर पोलिस ठाण्याचे हवालदार अरुण बाबुराव टोंगारे (52, रा. वासननगर, इंदिरानगर) यांचे मंगळवारी (ता. 30) रात्री कोरोनाची लागण झाल्याने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील अंधेरी येथील हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. अरुण बाबुराव टोंगारे यांची तीन आठवड्यांपूर्वी प्रकृती बिघडली होती. इंदिरानगर पोलिसातील त्यांचे सहकारी शिंदे यांना श्‍वसनाचा त्रास झाल्याने अरुण टोंगारे यांनीच त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. याच दरम्यान त्यांनाही लागण झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल केले असता त्यांचाही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतु दिवसेंदिवस प्रकृती खालावत गेल्याने सहा दिवसांपूर्वी त्यांना मुंबईच्या अंधेरी परिसरातील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. परंतु फुफ्फुसातील संसर्ग आणि रक्तभिसरणमध्ये मोठ्याप्रमाणात प्रादूर्भाव झाल्याने अखेर मंगळवारी (ता. 30) रात्री त्यांची कोरोनाविरोधातील लढा संपुष्ठात आला. त्यांच्या कुटूंबियांनाही यादरम्यान कोरोनाची लागण झाली होती परंतु उपचारानंतर ते निगेटिव्ह आलेले आहते. टोंगारे यांच्यावर अंधेरीच्या स्मशानभूमीमध्ये बुधवारी (ता. 1) पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. 
अरुण टोंगारे हे मूळचे निफाड तालुक्‍यातील खेरवाडी येथील रहिवाशी होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची एक मुलगी ही भाभा रिसर्च इन्स्टीट्युटमध्ये इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर आहे तर एक मुलगी व मुलगा शिक्षण घेत आहेत. टोंगारे यांच्या निधनामुळे शहर पोलिसांमध्ये शोककळा पसरली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

पहिला बळी; सात जण झाले कोरोनामुक्त 
नाशिक ग्रामीण पोलिस दलापाठोपाठ नाशिक शहर पोलिसातही कोरोनाने शिरकाव केला आहे. गेल्या महिन्यात भद्रकाली पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आला असता, त्यांनी उपचारादरम्यान कोरोनावर मात केली. तर शहर पोलिसातील आत्तापर्यंत 12 पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आले असून, यातील सात पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली तर हवालदार टोंगारे हे पहिला कोरोनाचे पहिले बळी ठरले आहेत. तर नाशिक ग्रामीण पोलिसात दलातील तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून ते तिघेही नाशिकमधीलच रहिवाशी होते.  

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first police death due to corona in city nashik marathi news