esakal | डोळ्यादेखत स्वप्नांची राखरांगोळी! शॉकसर्किटमुळे आगीने घेतला पेट; नागरिकांची उडाली धांदल
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon fire.jpg

तीनही अग्निशामक दलाच्या बंबांनी तातडीने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. लाकडी फळ्या व पट्ट्यांचे घर, दुकान असल्याने ते मात्र जळून खाक झाले. किराणा दुकानातील साहित्यही जळाल्याने दोन लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

डोळ्यादेखत स्वप्नांची राखरांगोळी! शॉकसर्किटमुळे आगीने घेतला पेट; नागरिकांची उडाली धांदल

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक : (मालेगाव) शहरातील पुर्व भागातील सर्वाधिक वर्दळीच्या व मोठी बाजारपेठ असलेल्या मच्छी बाजार भागातील रियाज शेख इस्माईल यांच्या मालकीच्या रियाज किराणा या दुकानाला सोमवारी (ता.१९) सकाळी साडेसहाच्या सुमारास मोठी आग लागली. शॉकसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आगीत दांडापटाईचे असलेले दुकान व दुसऱ्या मजल्यावरील फळ्यांचे घर जळून खाक झाल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

दोन लाखाहून अधिक नुकसान 

जुन्या महामार्गाने जाणाऱ्या नागरिकांनी अवघ्या दहा मिनिटात महापालिका अग्निशामक दलाला या आगीची माहिती कळवली. महापालिका मुख्य अग्निशामक दलाचे दोन व आझादनगर भागातील ख्वाजा गरीबनवाज केंद्राचा एक असे तीन बंब तातडीने पाऊणेसातच्या सुमारास घटनास्थळी पोचले. तीनही अग्निशामक दलाच्या बंबांनी तातडीने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. लाकडी फळ्या व पट्ट्यांचे घर, दुकान असल्याने ते मात्र जळून खाक झाले. किराणा दुकानातील साहित्यही जळाल्याने दोन लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

या भागातील बहुसंख्य घरे दांडापटाई, पत्रा, लाकडी फळ्या आदींचे आहे. नजीकच बादशाह खान नगर झोपडपट्टीही होती. आग तातडीने विझल्याने शेजारील रहिवाशी अथवा झोपड्यांना त्याची झळ बसली नाही, असे अग्निशामन अधिक्षक संजय पवार यांनी सांगितले. अग्निशामक दल व शहर पोलिस ठाण्यात आगीची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात साठफुटी रस्त्यावरील निताज क्रिएशन्स या शोभेच्या वस्तु विक्री करणाऱ्या दुकान व गोदामाला आग लागल्याने ५० लाखापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे समजते.  

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश