गंभीर...हा तर चक्क जीवाशी खेळ..धरणात 'हा' कुठला प्रकार सुरू?

मंगळवार, 30 जून 2020

वैतरणा धरणात एक गंभीर प्रकार सुरू आहे. या धरणाच्या पाण्याचा पुरवठा मुंबईसारख्या महानगराला केला जातो. त्यामुळे अशा पद्धतीने अवैधरित्या काम करणाऱ्या टोळीवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 

नाशिक / काळुस्ते : इगतपुरी तालुक्‍यातील वैतरणा धरणात विषारी द्रव्ये व रसायन टाकून मासेमारी करण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. या धरणाच्या पाण्याचा पुरवठा मुंबईसारख्या महानगराला केला जातो. त्यामुळे अशा पद्धतीने अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या टोळीवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 

अधिकारी काय कार्यवाही करतात, याकडे सर्वांचे लक्ष

धरणात विषारी रसायन टाकल्याने माशांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यातून पाण्याच्या प्रदूषणातही वाढ होत आहे. अशा घटना वाढत गेल्यास हे पाणी पिण्यायोग्यही राहणार नाही. या धरणात विषारी औषधे, रसायन टाकून मासेमारी केली जात असल्याची गंभीर बाब श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते भगवान मधे यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे यावर पाटबंधारे विभागाचे अधिकारी काय कार्यवाही करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?