दोन संशयित चोरांकडून पाच दुचाकी, मोबाईल जप्त; वडनेरभैरव पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक मालेगाव श्री. खांडवी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मनमाड श्री. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी त्यांच्या पथकासह चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा निष्पन्न केला.

सोग्रस (नाशिक) : वडनेरभैरव पोलिस ठाण्यात दाखल मोबाइल चोरीच्या गुन्ह्याची उकल करताना नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सटाणा, देवळा, वडनेर खाकुर्डी, वणी पोलिस ठाण्यांतील गुन्ह्याची उकल करून पाच दुचाकी व पाच स्मार्ट मोबाइल फोन चोरणाऱ्या दोन संशयित आरोपींविरुद्ध वडनेरभैरव (ता. चांदवड) पोलिसांनी धडक कारवाई केली. 

आरोपींकडून पाच दुचाकी व पाच स्मार्टफोन हस्तगत 

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांचे विशेषत: मोटार वाहन चोरीच्या गुन्ह्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेशित केले आहे. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक मालेगाव श्री. खांडवी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मनमाड श्री. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी त्यांच्या पथकासह चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा निष्पन्न केला. गुन्ह्यात संशयित आरोपी गोटीराम ऊर्फ गणेश नामदेव वाघ (वय २१, रा. खंडाळ वाडी, वडनेरभैरव) आणि सूरज शंकर आहेर (वय २२, रा. कोकण टेंभी, वडनेरभैरव) यांच्याकडून नाशिक ग्रामीण जिल्ह्यात व इतरत्र पोलिस ठाणे हद्दीतील दुचाकीचोरीची कबुली दिल्याने दोन पथकांनी आरोपींकडून पाच दुचाकी व पाच स्मार्टफोन हस्तगत केले. 

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

दुचाकी आरोपींनी देवळा, सटाणा, वडनेर खाकुर्डी आणि वणी पोलिस ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे अधिक मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे. या गुन्हेगारांना पकडणाऱ्या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव, पोलिस उपनिरीक्षक गवारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलास इंद्रेकर, पोलिस नाईक संतोष वाघ, पोलिस नाईक कराड, पोलिस नाईक घुमरे, मोरेश्वर पिठे, किसन कापसे यांचा समावेश होता.  

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five bikes, mobiles seized from two suspected thieves nashik marathi news