कावरेबावरे झाालेल्या दोघांवर पोलीसांचा संशय..पोलिसी खाक्या दाखविताच झाला खुलासा!

motorcycle
motorcycle

नाशिक : सोमवारी मध्यरात्री शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, हवालदार नाझीम पठाण, दिलीप मोंढे रात्रीच्या गस्तीवर होते. त्या वेळी आडगाव उड्डाणपुलाजवळच्या प्रताप ढाबा येथे पल्सर थांबवून संशयित पवार व सावंत संशयास्पद फिरताना आढळले. त्यानंतर..

घडले असे की...

सोमवारी (ता. ६) मध्यरात्री शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, हवालदार नाझीम पठाण, दिलीप मोंढे रात्रीच्या गस्तीवर होते. त्या वेळी आडगाव उड्डाणपुलाजवळच्या प्रताप ढाबा येथे पल्सर (एमएच ४१ बीए ०६३१) थांबवून संशयित पवार व सावंत संशयास्पद फिरताना आढळले. पोलिसांनी संशयितांकडे विचारणा केली असता, सटाण्याला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांची अधिक चौकशी केली असता, ते कावरेबावरे झाले. त्यामुळे दोघांना ताब्यात घेत, गुन्हे शाखेत आणले. पोलिसी खाक्या दाखविताच, दोघांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. सिडकोतील पवननगर परिसरातून त्यांनी ६० हजारांची पल्सर चोरल्याचे कबूल केले. संशयितांकडून आणखी चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, चार लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

कावरेबावरे झाालेल्या दोघांवर पोलीसांचा संशय...

मुंबई महामार्गावरील आडगाव शिवारातून दोघांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच संशयितांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली. संशयितांकडून सुमारे पाच लाखांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. यात अंबड हद्दीतील तीन, तर एक ओझरमधील दुचाकी आहे. संदीप पवार (वय १९, रा. नवेगाव, ता. बागलाण), अंकुश सावंत (२४, रा. निंबोळा, ता. सटाणा) अशी संशयितांची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com