#Lockdown : लॉकडाऊन मध्ये "फुल खिले है गुलशन गुलशन!" पाहा..!

केशव मते : सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 29 मार्च 2020

शहरीकरण वाढत असताना पुर्वी शेती असलेल्या या तवली फाटा परिसरात आता नववसाहती वाढल्या आहेत. मात्र रसाळ हे आपली आवड जोपासत घरासमोरील परिसरातच फुलांची बाग फुलविण्याचे काम करत आहे. 

नाशिक / मखमलाबाद : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. घरी थांबुनच वर्क फ्रॉम होम अनेकांचे सुरु आहे. अशातच घरी राहून रंगीबेरगी फुलांची अंगणातील परसबाग फुलविण्याचे काम मखमलाबाद येथील दिलीप रसाळ करत आहेत. शहरीकरण वाढत असताना पुर्वी शेती असलेल्या या तवली फाटा परिसरात आता नववसाहती वाढल्या आहेत. मात्र रसाळ हे आपली आवड जोपासत घरासमोरील परिसरातच फुलांची बाग फुलविण्याचे काम करत आहे. 

भाजीपाला व फळझाडांची लागवड
लॉकडाऊनच्या 21 दिवसांत वेगवेगळे काम करायचा निर्णय कुटुंबीतील सर्वांनी घेतला आहे. रसाळ यांनी एका ड्रममध्ये कंपोस्ट खत तयार केले आहे. हे कंपोस्ट खत झाडांना दिले आहे. त्यात गुलकंद गुलाब, गावठी गुलाब, गडद गुलाब,मोगरा, सोनचाफा, जाई, जुई, सदाफुली, संक्रांतवेल, आईस्क्रिम वेल , पिवळी जास्वंद, लाल जास्वंद, माणिप्लान्ट, मधुमालती वेल, दलिया, शेवंती या फुलझाडांची लागवड केली आहे. घराच्या गच्चीवर मिरची, कांदे, डांगर, हरबरा, खुरासनी, टोमॅटो, शेपू, पालक, वालवड, तुरीच्या शेंगांचे झाड तसेच इतरही फळझाडे लावलेली आहे. 

Image may contain: plant, flower and outdoor

हेही वाचा > #Lockdown : 'ताई, खूप दिवसांनी घरचं जेवण मिळालं!'...अन् 'त्या' पोलिसांचे डोळे पाणावले​

Image may contain: plant, nature and outdoor

घराचा परिसर फुलझाडांनी बहरला
कोरोनापासुन बचाव करतांना स्वत:ला लॉकडाऊन करत घराच्या परिसरात झाडे लावली आहेत.यातील पुर्वीच्या काही रोपांना लाल भुरकट माती,तसेच कोकोपीट व कंपोस्ट खत वापरुन पुन्हा नव्याने लावले आहेत.घराच्या परिसर फुलझाडांनी बहरला आहे.  

हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 'त्या' अनोळखी तरुणाच्या मदतीला देवदूतासारखा धावून आला!

Image may contain: plant


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flower garden in lockdown Nashik Marathi News