उझबेकिस्तानच्‍या ‍जमिरा यांना भेटला नाशिकमध्ये देव! अन्‍य रुग्णांनाही भेटीची आस 

doctor image.jpg
doctor image.jpg

नाशिक : मेडिकल टुरिझममध्ये नाशिकचे नाव जगाच्‍या नकाशावर असल्याने जमिरा यांच्‍यासारखे अनेक रुग्ण नाशिकला उपचारार्थ येण्यास इच्‍छुक आहेत. परंतु लॉकडाउनमुळे विमानसेवेअभावी नाशिकला येऊ न शकणाऱ्या जगभरातील अनेक अत्यवस्थ रुग्‍णांना लॉकडाउन संपण्याचे वेध लागले आहेत. 

ताश्‍कंदच्‍या ‍जमिरा यांना नाशिकला डॉक्‍टररूपी देवाचे दर्शन

जमिरा यांचा फुफ्फुसाचा कर्करोग अंतिम टप्प्यात असल्‍याचे निदर्शनात आले. हाडांसह अन्‍य भागांत कर्करोगाच्या फैलावामुळे त्यांची वाचण्याची शक्‍यता नसल्‍याचे तेथील डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र काहीही झालं तरी आईला वाचवायचं, अशी कर्करोगग्रस्‍त जमिरा यांच्‍या मुलाची धडपड असताना त्यांना ताश्‍कंदला डॉ. राज नगरकर यांनी जमिरा यांना उपचारासाठी नाशिकला येण्याचा सल्‍ला दिला.

अत्‍यावस्‍थ स्‍थितीत ताश्‍कंद ते नाशिक इतक्‍या लांब न्‍यावे का, याबद्दल द्विधाःमनस्‍थितीतील त्यांच्या कुटुंबाने धैर्याने त्‍यांना नाशिकला आणले. जुलै २०१९ ला व्हीलचेअरवर आलेल्या जमिरा एचसीजी मानवता कॅन्‍सर हॉस्‍पिटलच्या प्रयत्‍नांतून वर्षभरानंतर चालू-फिरू लागल्या. डॉक्‍टरांच्‍या प्रयत्नामुळे भारावलेल्‍या जमिरा कुटुंबीयांकडून कृतज्ञता व्यक्त करतात. 

लॉकडाउनमुळे विदेशी रुग्ण उपचारापासून वंचित 
हॉस्‍पिटलमध्ये रेडिएशन देताना केलेल्या काही चाचण्यांत त्‍यांची ईजीएफआर चाचणी पॉझिटिव्ह‍ह आली. पण त्यावर औषधोपचाराद्वारेच उपचाराचा निष्कर्ष काढला. त्यानंतरच्या पंधरा दिवसांच्या वास्‍तव्‍यास त्‍यांच्‍या ८० टक्‍के वेदना कमी झाल्‍या. औषधोपचार सुरू असताना त्यांनी ताजमहाल व अन्‍य प्रेक्षणीय स्‍थळांना भेट दिली. आज वर्षभरानंतरही जमिरा यांची प्रकृती सुधारत असून, दैनंदिन काम त्या स्‍वतःच करतात.. 

अन्‍य रुग्णांना भेटीची आस 

फुफ्फुसाचा कर्करोग अंतिम टप्प्यात पोचल्‍याने घरीच सेवा करण्याचा सल्‍ला ताश्‍कंद (उझबेकिस्तान) येथील डॉक्‍टरांनी जमिरा यांना दिला होता. ओपीडीसाठी गेलेल्‍या डॉ. राज नगरकर यांनी तपासणीनंतर नाशिकला उपचाराचा पर्याय सुचविला.

वर्षभरानंतर जमिरा मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये भेटलेल्‍या डॉक्‍टररूपी देवाविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करताय. पण त्याचवेळी जमिरा यांच्यासारख्या असंख्य विदेशी रुग्णांना उपचारासाठी नाशिकला येण्याची इच्‍छा असूनही लॉकडाउनमुळे येता येत नाही. 
ताश्‍कंद येथील जमिरा यांचे उदाहरण विदेशी रुग्णांच्या अडचणीचे प्रातिनिधिक आहे.

हेही वाचा > VIDEO : बघ्यांची भरलेली जत्रा बघताच बिबट्या बिथरतो तेव्हा....काय घडले?
अशा असंख्य रुग्‍णांचा प्रश्‍न 
मेडिकल टुरिझममध्ये नाशिकचे नाव जगाच्‍या नकाशावर असल्याने जमिरा यांच्‍यासारखे अनेक रुग्ण नाशिकला उपचारार्थ येण्यास इच्‍छुक आहेत. परंतु लॉकडाउनमुळे विमानसेवेअभावी नाशिकला येऊ न शकणाऱ्या जगभरातील अनेक अत्यवस्थ रुग्‍णांना लॉकडाउन संपण्याचे वेध लागले आहेत. 

पर्यायी व्‍यवस्‍था करणे आवश्‍यक ​

गेल्‍या वर्षी जुलैत ताश्‍कंदमधील ओपीडीदरम्‍यान जमिरा यांची भेट झाली. आज वर्षभरानंतर त्‍यांची प्रकृती स्‍थिर असल्‍याने कुटुंबीयांनी व्‍यक्‍त केलेल्‍या कृतज्ञतेमुळे समाधान वाटते. असे अनेक रुग्ण सध्याच्‍या परिस्थितीमुळे उपचारार्थ येऊ शकत नाहीत. त्‍यांच्‍यासाठीदेखील पर्यायी व्‍यवस्‍था करणे आवश्‍यक झाले आहे. -डॉ. राज नगरकर, चीफ कॅन्‍सर व रोबॉटिक सर्जन, 
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर
.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com